मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खान चांगलाच चर्चेत आला आहे.  मनोजच्या सुसाईड नोटमध्ये साहिल आत्महत्येसाठी दोषी असल्याचं म्हटलं आहे. मनोजने 2016 मध्ये मिस्टर इंडियाचे विजेतेपद पटकावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढेच नाही तर त्याने देशभरात अनेक बॉडी बिल्डींग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मनोजने साहिलवर स्वत: ला मानसिक छळ केल्याचा आणि स्वतःला सोशल मीडिया गुंडगिरीचा बळी बनवल्याचा आरोप केला आहे.


त्यानंतर साहिल खानने माध्यमांशी संवाद साधत मनोजने केलेले आरोप फेटाळले. आणि मनोज अनेकांची फसवणूक करत असल्याचा ही दावा केला. पण साहिल खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.


ओशिवरा पोलिसांनी साहिल खानला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल म्हणाला होता की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मनोज पाटीलने राज फौजदारला 2 लाख रुपयांचे बनावट आणि इक्सापायर स्टेरॉयड विकले होते. साहिलने या गोष्टीचा खुलासा करत स्टेरॉयड विकत घेतल्याच्या पावत्या आणि इंजेक्शन देखील दाखवल्या आहेत.