Sai Tamhankar bikini photoshoot:  सौंदर्य आणि अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण करून मराठी चित्रपटांपासून हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा नाव कमावलेली अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) आज सर्वाना खूप आवडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत वेगवेगळ्या थाटणीचे सिनेमे घेऊन आपल्या अभिनयाची छाप सईने नेहमीच सोडलीये. फॅशन फिटनेस (fashion and fitness) सर्वांच्याच बाबतीत सई नेहमीच अग्रेसर राहिलेय. 


बॉलीवूडमध्येसुद्धा सईचा बोलबाला आहे. नुकतंच तिला मिमी या हिंदी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. (sai tamhankar got filmfare award for mimi hindi movie )


आणखी वाचा: Samantha Ruth Prabhu प्रेग्नेंट? लवकरच देणार गुडन्यूज..सगळीकडे तिचीच चर्चा


हटके अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी  सईने नुकतंच ‘वुमन फिटनेस’ या मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. (woman fitness magazine)


या मासिकाच्या कव्हर फोटोवर असलेल्या सईच्या बिकीनीतील फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मासिकाचा फोटो शेअर करत पोस्ट लिहली आहे.(sai tamhankar posted on instagram)


आणखी वाचा: ''एकवेळ अन्नाशिवाय राहीन पण शारीरिक सुखाशिवाय..Samantha Ruth Prabhuने केला खुलासा..पाहा video


सई हि पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने मराठी सिनेमात बिकिनी लुक दिला होता (sai in bikini). यानंतर तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती .अनेकांनी तिला ट्रोलसुद्धा केलं होत. 
  
काय लिहिलंय सईने 


''बूम.. माझ्यासाठी फिटनेस हा एक कठीण पण  तितकाच प्रभावी विषय राहिलाय.माझा विश्वास आहे की सातत्य आणि सातत्य हे प्रत्येक गोष्टीचं मूळ आहे.


मी हे लिहित असताना, मी अजूनही यात आणखी सर्वोत्तम होण्यासाठी धडपडत आहे. @womenfitnessorg च्या मुखपृष्ठावर फोटो आल्याने कायम शारीरिक सुदृढता जपण्याची ताकद मला मिळाली आहे.


आणखी वाचा:पहिल्या भूमिकेसाठी त्याच्यासोबत घालवावी लागली रात्र? ..टॉपच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा


शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत”, असं म्हणत सईने आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं आहे.सध्या सगळीकडे सईच्या या फोटोशूटची जोरात चर्चा आहे.