Sai Tamhankar Confirms Breakup : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत येते. आता तिचं चर्चेत येण्याचं कारण तिचं खासगी आयुष्य आहे. सई ताम्हणकर बऱ्याच काळापासून निर्माता अनिश जोगसोबत रिलेशनशिपमध्ये होते. तर सई ताम्हणकरनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तिच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सई ताम्हणकरणनं तिच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होतं की 'I’m single by choice. Not my choice. But it’s still a choice' त्याशिवाय तिनं अनिश जोगसोबत सगळे फोटो देखील सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केले आहेत. तर सई ताम्हणकरनं नुकतीच 'एचटी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सईनं तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत खुलासा केला की "हो, आम्ही विभक्त झालो आहोत आणि हा निर्णय आम्ही दोघांनी ठरवून घेतला आहे. हा निर्णय घेणं कठीण होतं पण ते झालं आणि आहे ते आहे. तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची असलेली व्यक्ती आहे आणि कायम राहणार. त्यालाही असचं वाटतं हे मला माहित आहे." दरम्यान, ते दोघं आधी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसायचे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे नाही तर नेटकऱ्यांच्या पसंतीस देखील उतरायचे. दुसरीकडे अनिशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सईनं त्याच्यासोबतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केले आहेत. 



हेही वाचा : 'अरे मी सिंगल आहे आता....'; चाहत्यानं मलायकाविषयी प्रश्न विचारताच अर्जुननं दिलं असं उत्तर


सई ताम्हणकरच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर अनिश जोग आधी ती अमेय गोसावीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघं 2013 मध्ये लग्न बंधनात अडकले होते आणि त्यानंतर 2015 मध्ये ते विभक्त झाले. दरम्यान, सई ताम्हणकर आणि अनिश जोग या दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. दरम्यान, मानवत मर्डस या सीरिजमध्ये नुकतीच सई ताम्हणकर दिसली. या सीरिजमध्ये मानवतमध्ये घडलेला हत्याकांड दाखवण्यात आला आहे.