Arjun Kapoor Malaika Arora Breakup : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' ला घेऊन चर्चेत आहे. तो संपूर्ण टीमसोबत चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. अशात दिवाळीच्या निमित्तानं या चित्रपटाची टीम ही दादरमध्ये दिवाळी सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती. या दरम्यान, चाहत्यांशी संपर्क साधत असताना अर्जून कपूर असं काही म्हणाला की त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की तो आणि मलायका हे विभक्त झाले आहेत.
या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन कपूरनं काळ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट परिधान केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण टीम उपस्थित होती. अजय देवगन, टायगर श्रॉफशिवाय दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील उपस्थित होते. त्यावेळी समोरून प्रेक्षकांमधून त्याला कोणी विचारलं की मलायका कशी आहे? तर त्यावर उत्तर देत अर्जुन कपूर म्हणाला, 'आता मी रिलॅक्समध्ये सिंगल आहे, त्यांनी मी उंच आणि हॅंडसम असल्याचं सांगितलं तर असं वाटलं की लग्नाचं बोलताय. पण सिंगल आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.'
अर्जुन कपूरनं पुढे म्हटलं की 'अजय आणि टायगर जे बोलले तेच मी पण बोलेन, आम्ही खूप प्रेमानं चित्रपट बनवला आहे. मला आशा आहे की तुम्ही सगळे मिळून आमच्यासोबत दिवाळी साजरी साजरी करणार आहाच आणि आमचा चित्रपट पाहाल. तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी धन्यवाद. मराठीत बोलायचा विचार करुन आलो होतो, पण आता बोलता येत नाही आहे. पुढच्या वेळी येऊन तेव्हा नक्कीच पूर्णपणे मराठीमध्ये बोलेन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.'
दरम्यान, 2017 मध्ये मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आले होते. दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला अशी चर्चा सुरु होत्या. मात्र, मलायका किंवा अर्जुननं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता अर्जुन कपूरनं सगळ्यांसमोर तो सिंगल असल्याचं कबूल करत त्याचा ब्रेकअप झाल्याचं सांगितलं आहे. ते दोघं विभक्त झाले असले तरी देखील मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर अर्जुन कपूर पूर्ण वेळ तिच्यासोबत तिची साथ देत उभा होता.
सिंघन अगेनविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा अर्जुन कपूर हा खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खान, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, करीना कपूर हे कलाकार दिसणार आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.