Sai Tamhankar Driver News: अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्दाम मंडल, वय 32, हा सई ताम्हणकरचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानं हॉर्न वाजल्यानं रागाच्या भरात चार जणांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार मालवणीच्या अंबुजवाडी येथे घडला आहे. अंबुजवाडी येथील ऑटो रिक्षा स्टॅण्ड येथील गेट क्रंमाक आठ या ठिकाणी हा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी मलिक या नावाच्या व्यक्तीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत इतरांचा तपास हा सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, यावेळी हे चौघंजण फारच विक्षिप्तपद्धतीनं रस्त्यावर गाडी चालवत होते त्यामुळे अपघात होऊ शकला असता तो टाळण्यासाठी सद्दाम हा हॉर्न वाजवत होता परंतु त्याचाच राग आल्यानं त्या दोघांनी रागाच्या भरात हे कृत्य केले आहे. त्यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिड डे'नं याप्रकरणी माहिती दिली आहे त्यात म्हटलं आहे की, या ड्रायव्हरला चार तरूणांनी बेल्ट आणि बांबू स्टीकनं मारहाण केली आहे. सद्दाम हा गेली सहा वर्षे सई ताम्हणकरचा ड्रायव्हर आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट रोजी घडला असून यावेळी सई ताम्हणकरला चिंचोळी भंडार येथून घरी जाताना त्याला मारहाण करण्यात आली होती. रस्त्यावर मारहाणीचे प्रकार हे अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्यावर कारवाईही केली जाते आहे. त्यातून या प्रकारानं पुन्हा एकदा गाडीचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगेलली असते. 


हेही वाचा : वादग्रस्त रिलेशनशिप्स, संघर्षमय आयुष्य; पंतप्रधानांची नात ते यशस्वी अभिनेत्री, ओळखलं का?


सई ताम्हणकर हिनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपट यांच्यातून कामं केली आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. नुकतीच ती दुनियादारी या चित्रपटाच्या 10 वर्षपुर्तीनिमित्त प्रेक्षकांच्या समोर आली होती. यानिमित्तानं 'चला हवा येऊ द्या'नं एक विशेष कार्यक्रम भरवला होता. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे इन्टाग्रामवरही चांगलेच फॉलोवर्स आहेत. तिची एक वेबसिरिजही प्रदर्शित होणार आहे. तिची 'क्राईम बीट' ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. झी फाईव्हवर ही सिरिज येणार आहे. 


सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेची. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 14 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.