IIFA पुरस्कारात सई ताम्हणकरची बाजी; पटकावला सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्री पुरस्कार
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
मुंबई : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आता सईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी सईला सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रींच्या विभागात नामांकन होतं. सईने दिमाखात या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत चारचाँद लावले आहेत. एवढंच नव्हेतर सईला अवॉर्ड सुद्धा मिळालं आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सई स्व:चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कायमच शेअर करत असते. सईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली की, लगेच व्हायरल होतोच. सईने आता पर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सईने अनेक मराठी सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसंच सुभाष घई यांच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या सिनेमातून सईने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं होतं. यानंतर सई बॉलिवूड चित्रपट 'मीमी'मध्ये दिसली. आणि मीमी या सिनेमातील तिच्या या भूमिकेलाच तिच्या (Best Supporting Actress) IIFA अवॉर्डस २०२२ मध्ये सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सईने या सोहळ्यासाठी खास लुक डिजाईन करून घेतला होता ज्यात खूप अप्रतिम ती खूप अप्रतिम दिसत होती. सईचा हा खास लूक मरमेड सारखा दिसणारा होता. तिचा हा लूक प्रसिद्ध डिझायनर साईशा शिंदेने डिझाईन केला होता.
तिने या चित्रपटात साकारलेली भूमिका शमा सगळ्यांनाच फार आवडली होती. या चित्रपटाच्या निमित्तानं तिला क्रिती सॅनॉन, पंकज त्रिपाठी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सईवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'मीमी' हा चित्रपट 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाला २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'मीमी' या सिनेमात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहेत.