Sai Tamhankar Post on Boyfriend Anish Jog Birthday: सई ताम्हणकर आपल्या हटके लुकासाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची कायमच चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपुर्वी तिनं तिच्या वाढदिवसाला आपला आणि प्रियकर अनिश जोग याच्यासोबत एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिच्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. आता आपल्या दौलतरावसोबत सईनं नवी पोस्ट शेअर केली आहे. आज अनीष जोगचा वाढदिवस आहे. त्यामुळे सईच्या या पोस्टवरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून अनीष जोग आणि सई ताम्हणकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा ते एकमेकांसोबत स्पॉट होताना दिसतात सोबतच त्यांचे स्पेनमधील फोटोही सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सईनं आपल्या दौलतराववर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू झाली आहे. सईनं यावेळी इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत तिनं इन्टाग्राम स्टोरीही शेअर केली आहे. तिनं शेअर केलेल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये तिनं म्हटलंय की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा My Gem. भरभरुन जग आणि खूश रहा. तुझ्यासारखी माणसं बनणं आता बंद झालं आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस याबाबत मी सर्वाधिक आनंदी आहे.' त्याचसोबत तिनं  #birthdayboy #appleofmyeye असे हॅशटॅग्सही टाकले आहेत. यावर अनीष जोगची प्रतिक्रियाही आली आहे. ज्यात त्यानं या पोस्टखाली कमेंट केली आहे. तो म्हणतो की, ''खूप खूप धन्यवाद प्रेम. तुझ्या या शुभेच्छांनी माझा दिवस छान गेला''


हेही वाचा - 'सत्यप्रेम की कथा'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी


त्याचसोबत त्यानं आपल्या कमेंटखाली खूप सारे हार्टचे हॅशटॅग्सही पोस्ट केले आहेत. त्याचसोबत सईनं एक इन्टाग्राम स्टोरीही टाकली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, Happy Birthday Taks तुझं आयुष्य तू अगदी भरभरून जगं... I Heart You'' असं तिनं पोस्टखाली म्हटलं आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी ते दोघं स्पेनमध्ये असल्याचे बोलले जाते आहे. सईनं आपला वाढदिवसही स्पेनमध्ये साजरा केला होता. तिच्या या फोटोखाली फॅन्सच्या तूफान कमेंट्स आल्या आहेत. 



मराठी इंडस्ट्रीतल्याही अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, मंजिरी ओक, प्रार्थना बेहेरे, प्रसाद ओक यांनीही कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे सध्या सई ताम्हणकरच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे.