Sai Tamhankar : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. पण सई सोशल मीडियावर सक्रिय असण्याचं कारण ही तिची पोस्ट नाही तर तिनं नुकतीच दिलेली एक मुलाखत आहे. सई नुकतीच अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात दिसली. त्यावेळी सईनं खुलासा केला की तिची जवळची मैत्रिण म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला सईनं उपाशी ठेवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सई ताम्हणकरनं नुकतीच 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत या कार्यक्रमात राजकीय मंडळींनीच हजेरी लावली होती. हे पाहता अचानक एका अभिनेत्रीला कार्यक्रमात पाहून अनेकांना आश्चर्य झाले होते. पण दुसरीकडे काही प्रेक्षकांना तिला पाहून आनंद झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 



अवधूत गुप्तेनं सई ताम्हणकरला विचारलं, 'तू लोकांना घरी जेवायला बोलावतेस आणि तासंतास उपाशी ठेवतेस हे खरं आहे का?' त्यावर सई म्हणाली, 'सोनाली कुलकर्णीचं लग्न झाल्यावर मी तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही घरी खूप टाईमपास करत होतो, मॅच बघत होतो. आम्ही गप्पांमध्ये आणि टाईमपास करण्यामध्ये इतके गुंतलो की मी दुपारचे जेवण बनवणार होते तर त्याला रात्र झाली आणि लंचचा प्लॅन डिनर झाला.' सईनं केलेल्या हा खुलासा ऐकूण अनेकांना आश्चर्य झालं. 


सईच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ती  'गर्लफ्रेंड', 'धुरळा', 'YZ', 'टाइम प्लीज', 'मुरांबा' अशा काही चित्रपटांचा निर्माता अनिश जोगसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सईचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता त्यानंतर सई अनिशसोबत रिलेशनशिपमध्ये आली. सई ही अनिशसोबत नेहमीच कुठे ना कुठे फिरताना दिसते. बऱ्याचवेळा ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. तर त्या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना देखील आनंद होतो. 


हेही वाचा : सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटातून Bobby Deol करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करणार एन्ट्री!


सई गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'पेटपुराण' या वेब सीरिजसाठी चर्चेत होती. त्या चित्रपटाशिवाय सई 'मिडियम स्पायसी' चित्रपटात दिसली. त्या आधी प्रदर्शित झालेला तिचा 'पॉडेंचरी' हा चित्रपटही गाजला होता. तर दोन वर्षांपुर्वी सईनं 'मिम्मी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटासाठी तिला आयफा अवोर्डही मिळाला आहे.