सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटातून Bobby Deol करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करणार एन्ट्री!

Bobby Deol in Kanguva Movie With Suriya :  दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत स्क्रिन शेअर करणार बॉबी देओल... पण यावेळी हिरो नाही तर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता...

दिक्षा पाटील | Updated: Jul 26, 2023, 03:01 PM IST
सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटातून Bobby Deol करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करणार एन्ट्री! title=
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol in Kanguva Movie With Suriya :  दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार सूर्याच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाची घोषणा सूर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आली. या चित्रपटाचं नाव 'कंगुवा' असं आहे. चित्रपटाचा टीझर हा हिंदी भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला होता. आता चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सूर्याचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्याच्या पदार्पणाची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटासाठी निर्मित्यांनी बॉबी देओलला निवडलं आहे. तर या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझरचं हा सूर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित केला. या चित्रपटात सूर्या आणि बॉबी या दोघांना एकत्र स्क्रिनवर एकमेकांच्या समोर येताना पाहण्यासाठी उस्तुक आहेत. दरम्यान, बॉबी देओलच्या चित्रपटातील एन्ट्रीविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. बॉबी देओलशिवाय 'कंगुवा' चित्रपटात सूर्यासोबत मुख्य भूमिकेत दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट देशभरात 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओलचा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दुसरा चित्रपट असणार आहे. कारण याशिवाय बॉबी देओल हा पवन कल्याण यांच्या 'हरि हर वीरा मल्लू' चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला किंवा प्री-प्रोडक्शनला सुरुवात केलेली नाही. 

हेही वाचा : 'मी बहिरी नाही...', पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या Jaya Bachchan व्हिडीओ व्हायरल

रिपोर्ट्सनुसार, 'कंगुवा' हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर बॉबी देओल पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये बॅंकॉक आणि थायलंड येथे होणार आहे. तर हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलिंगवर आधारीत आहे. तर 'कंगुवा' हा चित्रपट 2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.