Sai Tamhankar In khupte tithe gupte: प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आपल्या भाषाशैलीमुळे तिने अनेक लोकांना आपलंसं केलंय. त्याचबरोबर तिने लाखो प्रेक्षकांची मनं देखील जिंकली आहेत. अशातच सई ताम्हणकरने अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या (khupte tithe gupte) कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी तिने अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली. या कार्यक्रमात सईला तिच्या खास मैत्रिणीचा (Girija Oak) व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यावेळी सई देखील खदाखदा हसली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवधुत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना अभिनेत्री सई ताम्हणकर सामोरं गेली. त्यावेळी अभिनेत्री गिरीजा ओकने सईबद्दल खुपणाऱ्या गोष्टीचा खुलासा केला. जेव्हा जेव्हा सईच्या आयुष्यात प्रेम येतं, रोमान्स येतो तेव्हा तेव्हा ती मला विसरते, असं गिरीजा म्हणते. पण मला असं वाटतं की आता तो तसा जुना झालाय. तर ये आता परत माझ्याकडे, असं म्हणत गिरीजाने सईला सल्ला दिला. त्यावर सईला हसू आवरलं नाही. सई ताम्हणकर आणि गिरीजा ओक या एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. याच कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने सईची पोलखोल केली.


सई ताम्हणकर लोकांना जेवायला घरी बोलवते आणि मुद्दामून तासनतास उपाशी ठेवते, असं सोनाली कुलकर्णीने सांगितलं. त्यावर सई ताम्हणकरने खुलासा केला. जेव्हा सोनालीचं नवीन लग्न झालेलं तेव्हा मी तिला आणि तिच्या नवऱ्याला जेवायला बोलावलं. तिने त्यावेळी मी जेवण करेन असं सांगितलं. पण फक्त त्यांना मी दुपारी जेवायला बोलावलेलं पण जेवण बनवता बनवता त्याची रात्र झाली, असा किस्सा सईने सांगितला. हा किस्सा सांगताना सईला देखील हसू आवरलं नाही. तिच्या या उत्तरावर तिथे उपस्थित सगळेच हसू लागतात. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.


पाहा Video



दरम्यान, 'खुपते तिथे गुप्ते' या (khupte tithe gupte) कार्यक्रमामध्ये तुला शेंबडी पोरं आवडतात, असं म्हणत सईला सवाल केला. त्यावर तू बराच अभ्यास केलेला दिसतोय, असं म्हणत ती जोरजोरात हसली. नुकतंच सईच्या 'दुनियादारी' या चित्रपटाला लवकरच 10 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने ती 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी देखील सईने अनेक किस्से सांगितले होते.