मुंबई : बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याने 1991 मध्ये कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले. जेव्हा दोघे पहिल्यांदा भेटले होते. तोपर्यंत अमृता सिंग बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी सैफ अली खान इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी असतानाही दोघांनी कशाचीही पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र 13 वर्षांनंतर 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सैफ अली खान एका मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाबद्दल बोलला.


जेव्हा सैफ अली खानला मुलाखतीत विचारण्यात आले की, 'तुम्ही घटस्फोटाच्या कठीण टप्प्यातून गेला होता. तुम्ही मुलांना याबद्दल कसं सांगितलं? तुमच्या मनावर ते ओझं होतं का?' 


यावर सैफ म्हणाला, 'खरंच, ही सर्वात भयानक गोष्ट आहे. आज सुद्धा मला कधी कधी वाटतं की सर्वकाही वेगळं असायला हवं होतं. हे कोणत्याही परिस्थिती योग्य नाही. अमृतापासून वेगळे होणे हा माझ्यासाठी कठीण निर्णय होता. तिच्यासोबत सर्व काही नीट व्हावं, आमचं नातं नीट राहावं यासाठी खूप प्रयत्न केले होते.


सैफ अली खान पुढे म्हणाला, 'लग्नाच्या वेळी मी फक्त 20 वर्षांचा होतो. मी अमृतापासून वेगळं होण्याचा विचार कधीच केला नाही.पालक होणे ही खूप मोठी जबाबदारी आहे.



कौटुंबिक सुख एखाद्या लहान मूलांला मिळू नये ही सर्वात वाईट गोष्ट आहे. पण माझ्यासाठी ते सोपं नव्हतं. पण अनेक वेळा घरातील शांततेसाठी असे निर्णय घ्यावे लागतात. मला सारा आणि इब्राहिमला चांगेल वातावरण मिळावे यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. आणि मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला."