`तुम्ही किती वेळ आराम करता?` सैफच्या प्रश्नाला मोदींनी दिलेलं उत्तर ऐकून सारेच थक्क
Saif Ali Khan Asked PM Modi This Question: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच कपूर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस करिना कपूरचा पती आणि अभनेता सैफ अली खानही त्यांच्यासोबत होता.
Saif Ali Khan Asked PM Modi This Question: अभिनेता सैफ अली खानने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेतली. संपूर्ण कपूर कुटुंबाबरोबर जावई असलेल्या सैफने मोदींची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या भेटीसंदर्भात सैफने काही खुलासे केले आहेत. शो मन अशी ओळख असलेल्या राज कुपर यांच्या 100 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या भेटीमध्ये काय झालं याबद्दलची माहिती सैफने दिली. "संसदेमधील कामकाज संपल्यानंतर ते आले होते. त्यामुळे ते थकलेले असतील असं मला वाटत होतं. मात्र ते आमच्याकडे पाहून छान हासले. ते फार उत्साही वाटले," असं सैफने मोदींबद्दल बोलताना सांगितलं.
कपूर कुटुंबाने घेतली मोदींची भेट
पत्नी करिना कपूरबरोबरच करिष्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, नितू सिंग, अदर आणि अरमान जैन या कुटुंबातील सदस्यांसोबत सैफही मोदींना भेटला. "मी करिनाच्या माध्यमातून या भेटीचा भाग झालो याचं मला समाधान आहे. राज साहाब यांच्या 100 व्या जन्मवर्षानिमित्त त्यांच्या नावाचं टपाल तिकीट छापलं गेलं हा संपूर्ण कुटुंबाचा सन्मान आहे," असं सैफने या भेटीसंदर्भात 'एचटी सिटी'शी संवाद साधताना म्हटलं.
आई-वडिलांबद्दल विचारलं आणि तैमुर, जहांगीरसाठी घेतली सही
सैफने पंतप्रधान मोदींनी आपल्याबरोबर बोलताना आई शर्मिला टागोर आणि दिवंगत वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याबद्दलही गप्पा मारल्याचं सांगितलं. "त्यांनी माझ्या पालकांबद्दल चौकशी केली. आम्ही तैमुर आणि जहांगीरला घेऊन येऊ असं त्यांना वाटत होतं. करिनाने तैमुर आणि जहांगीरसाठी त्यांची स्वाक्षरी घेतली," असं सैफने सांगितलं.
"मी मोदींना विचारलं तुम्ही किती वेळ आराम करता?"
"माझ्या मते देश चालवण्यासाठी ते (पंतप्रधान मोदी) फार कष्ट घेत आहेत. एवढं असतानाही ते अशाप्रकारच्या भेटींसाठी वेळ काढतात हे कौतुकास्पद आहे. तुम्ही किती वेळ आराम करता असं मी त्यांना विचरला. त्यावर त्यांनी रात्री तीन तास आराम करतो असं सांगितलं," असंही सैफ मोदींबरोबर झालेल्या गप्पांसंदर्भातील माहिती देताना म्हणाला. मोदींचं उत्तर ऐकून थक्क झाल्याचं सैफच्या हावभावावरुन दिसत होतं.
मोदींचे मानले आभार
"माझ्यासाठी हा (मोदींच्या भेटीचा) दिवस फार खास होता. त्यांनी आम्हाला भेटण्यासाठी एवढा वेळ दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी आमचा जो मानसन्मान केला त्यासाठीही मी त्यांचे आभार मानले," असं सैफ म्हणाला.