Saif Ali Khan : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) 'आदिपुरुष' सिनेमामुळे चर्चेत आहे.  'आदिपुरुष' सिनेमात अभिनेता रावणाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण टीझरमधील सैफचा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी सुरु झाली. एकीकडे आगामी सिनेमामुळे वादाच्या भोवऱ्यात सैफ अडकला आहे, तर दुसरीकडे बिल्डरच्या (builder ) वागण्याला कंटाळून सैफने त्याच्या विरोधात केस दाखल केल्याचं वृत्त समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण
सैफने मिडसीटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर 53.34 कोटी रुपयांचे तीन आपार्टमेंट खरेदी केले होते. या आपार्टमेंटचं काम अभिनेत्याने 2019 साली पूर्ण करुन मागितलं होतं. पण वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे सैफने बिल्डर विरोधात महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी विभागात तक्रार केली आहे. (saif ali khan property)


एवढंच नाही तर सैफने नुकसान भरपाई म्हणून बिल्डरकडून तब्बल 7 कोटी रुपयांची मागणी केली आहे. शिवाय त्यावर 18 टक्के जीएसटी देखील मागितली आहे. (compensation worth more than rs 7 crore)


पण सैफने केलेले आरोप बिल्डरने फेटाळले आहेत. बिल्डर म्हणाला, 'सैफ अली खानने अपार्टमेंटसाठी कोणताही पेमेंट केलेला नाही. शिवाय आपर्टमेंट खरेदी करण्यासाठी कोणताही रस दाखवलेला नाही. सैफला अपार्टमेंट्स तयार झाल्याची माहिती देण्यात आली होती असं बिल्डरचं म्हणणं आहे. (saif ali khan net worth)


Amruta Fadnavis यांची बॉलिवूडमध्ये सुरेल एन्ट्री; Video Viral


बिल्डर आणि सैफ अली खानची बाजू लक्षात घेवून अथॉरिटने सैफ आणि बिल्डरला पार्शियल रिलीफ दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी काय होतं आणि सैफ कोणतं पाऊल उचलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.