मुंबई : सारा अली खानने आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांच मन जिंकल आहे. 'केदारनाथ' आणि 'सिंबा' या दोन सिनेमानंतर तिच्याकडे सिनेमाची लांबच लांब रांग लागली आहे. साराचा आगामी सिनेमा 'लव आज कल 2' लवकरच येत आहे. एवढंच नव्हे तर सारा वरूण धवनसोबत 'कुली नंबर 1' चा रिमेक शुट करत आहे. साराने नुकताच भाऊ इब्राहमसोबत एका 'मॅगझीन'करता शूट केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅगझीनशी बोलताना सारा, इब्राहिम आणि त्यांची आई अभिनेत्री अमृता सिंहने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. साराने या मुलाखतीत वडिल, अभिनेता सैफ अली खानच्या दुसऱ्या लग्नाबाबत खूप मोठा खुलासा केला. सारा म्हणते की, जेव्हा अब्बा आणि करीनाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा माझी आई मला लॉकरजवळ घेऊन गेली. सगळे दागिने बाहेर काढून म्हणाली, तुला कोणते झुमके घालायचे आहेत? आईने अबू जानी आणि संदीप खोसलाला फोन करून सांगितलं होतं की, सैफ लग्न करतोय. आणि मला वाटतं साराने त्या लग्नात खूप चांगला लेहंगा घालून जावं. यावरून अमृताचे तेव्हाचे विचार स्पष्ट होतात. 



मुलाखतीत, अमृता देखील मुलांबद्दल भरभरून बोलली. अमृताने इब्राहिमबद्दल सांगितलं की, इब्राहिम हा घरात एका ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे असतो. कायम शांत आणि जेंट असलेला इब्राहिम कोणत्याही संकटांना हसत सामोरे जातो. पण मला सारा आणि इब्राहिमची एक गोष्ट खटकते ते दोघं ही निष्काळजी आहे.    



तर साराबद्दल बोलताना अमृता म्हणाली की, सारा खूपच नियमात राहणारी मुलगी आहे. महत्वाचं म्हणजे सारा सगळ्यांचा आदर करते. ती कायमच आपलं काम, डोकं आणि शरीराबाबत नियमात असते. स्वतःला बॅलेन्स ठेवण्यासाठी ती प्रयत्नशील असते. तर इब्राहिमने देखील साराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, माझं आणि साराचं नातं खूपचं चांगलं आहे. आम्ही एकमेकांना समजून घेतो आणि खूपच कमी भांडतो.