मुंबई : बिल्डरांच्या मनमानीमुळे सगळेचजण नाराज आहेत. मालमत्ता खरेदीच्या नादात लाखो लोकं अडकले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वसामान्यांसोबतच सैफ अली खानसारखे सेलिब्रिटीही अशा मालमत्ता घोटाळ्याचे बळी ठरला आहे. याचा खुलासा खुद्द सैफने केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बंटी और बबली 2' मधील त्याची सह-अभिनेत्री राणी मुखर्जीशी बोलताना, सैफ अली खानने हा खुलासा केला की, काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या कमाईतील 70 टक्के रक्कम एका मालमत्तेत गुंतवली होती. मात्र आजपर्यंत त्याला ती मालमत्ता मिळालेली नाही.


चाय पर चर्चा' दरम्यान खुलासा
सैफ आणि राणी सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दोघां व्यतिरीक्त 'बंटी और बबली 2' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ यांच्याही भूमिका आहेत. निर्मात्यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  


सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये सैफ आणि राणी 'चाय पे चर्चा' करत आहेत. यावेळी सैफने त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेचा उल्लेख केला. सैफ आणि राणीचा हा चौथा एकत्र चित्रपट आहे. दोघांनी यापूर्वी 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोडा प्यार थोडा मॅजिक'मध्ये काम केलं आहे.



'बिल्डरने सांगितलं होतं  तीन वर्षांत प्रॉपर्टी देऊ'
व्हिडिओच्या एका भागात सैफने स्पष्ट केलं आहे की, तो प्रॉपर्टी स्कॅमचा बळी पडला आहे. तो म्हणाला, 'काही वर्षांपूर्वी मी एका प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले होते. त्यानंतर मी माझ्या एकूण कमाईपैकी 70 टक्के रक्कम बिल्डरच्या सांगण्यावरून गुंतवली. तीन वर्षांत हा प्रोजेक्ट तयार होईल, असं मला सांगण्यात आलं. पण ती प्रॉपर्टी मला अजून मिळालेली नाही.