Hathras Stampede: सरकारी नोकरी ते पायाच्या धुळीसाठी लगबग... 121 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भोलेबाबा कोण?

Hathras Stampede Who Is Bhole Baba: मंगळवारी उत्तर प्रदेशमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला आहे. हा सत्संग भोलेबाबा नावाच्या कथित धर्मगुरुने आयोजित केला होता. सोशल मीडियावर कुठेही नसलेल्या या बाबाच्या सत्संगासाठी हजारोंच्या संख्येनं लोक का उपस्थित राहायचे, नेमकं हा भोलेबाबा करायचा का? जाणून घेऊयात या कथित बाबाबद्दल...

| Jul 03, 2024, 14:27 PM IST
1/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमामधील चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याने या घटनेनं देश हादरून गेला आहे.  

2/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

हाथरसमधील पुलराई गावातील भोलेबाबा नावाच्या व्यक्तीच्या सस्तंग कार्यक्रमामसाठी हजारो भाविका जमले होते. याच वेळी या बाबांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी महिला भाविकांनी एकच गर्दी केली. या चेंगराचेंगरीमध्येच शेकडो भाविकांचा मृत्यू झाला.

3/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

भोलेबाबाचे अनेक कथित दैवी चमत्कार दाखवणारे फोटो आणि तसेच चमत्कारांमुळे त्यांच्या पायाची धूळ माथी लावण्याचा भाबड्या अपेक्षेपोटी महिलांनी मंचाकडे धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये शेकडो भाविकांनी प्राण गमावले. या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने चौकशी आदेश दिलेत.

4/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कथित भोलेबाबा 1990 च्या दशकापर्यंत पोलीस खात्यामध्ये कार्यरत होता. त्यानंतर त्याने राजीनामा देऊन सत्संग भरवण्यास सुरुवात केली. जवळपास 26 वर्षांपूर्वी त्याने नोकरीला राजीनामा देत देत धार्मिक प्रवचनाला सुरुवा केली.  

5/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रम संपल्यानंतर भोलेबाबाच्या पाया पडण्यासाठी आणि त्याच्या पायाची धूळ माथी लावण्यासाठी महिला भक्तांची मोठी गर्दी उसळली आणि त्यातच चेंगराचेंगरी झाली.   

6/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

भोलेबाबाचं खरं नाव नारायण साकार हरि उर्फ साकार विश्व हरी असं आहे. त्याचा जन्म एटी जिल्ह्यात झाला आहे. पटियाला तहसीलमधील बहादुर येथे जन्म झालेल्या भोलेबाबाकडून तो पूर्वी गुप्तचर विभागात कार्यरत होता असं सांगितलं जातं. मात्र ही नोकरी सोडून त्याने सत्संग सुरु केला.

7/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

सध्या उत्तर प्रदेशासहीत उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान आणि दिल्लीसही देशभरात भोलेबाबाचे लाखो भक्त आहेत.  कोरोना कालावधीमध्ये निर्बंध असतानाही या बाबाने हजारोंच्या संख्येनं भक्तांना एकत्र करत प्रवचनं केली होती.   

8/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

विशेष म्हणजे एकीकडे सर्व बाबा-बुवा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत असतानाच दुसरीकडे भोलेबाबा सोशल मीडियावर नाही. त्याचं एकाही सोशल मीडिया अकाऊंटवर खातं नाही. प्रत्यक्षात मात्र त्याला मानणारा मोठा जनसमुदाय आहे.   

9/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

पश्चिम उत्तर प्रदेशमधील अलीगढ येते हाथरस जिल्ह्यामध्ये दर मंगळवारी त्याच्या प्रवचनाचं आयोजन केलं जातं. या प्रवचनासाठी हजारोंच्या संख्येनं लोक उफस्थित राहतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या जेवणाबरोबरच इतर सर्व सुविधा पुरवल्या जातात.  

10/10

Hathras Stampede Who Is Bhole Baba

भोलेबाबा आपल्या भाविकांना कधी चमकणारं चक्र करंगळीवर दाखवायचा तर कधी डिजीटल माध्यमातून भ्रम निर्मितीच्या माध्यमातून भक्तांना मोहित करायचा. याचमुळे बाबाकडे दैवीशक्ती असून त्याच्या चरणाची धूळ माथ्याला लावल्यास आपलं भलं होईल या अपेक्षेने महिलांनी त्याच्या पाया पडण्यासाठी गर्दी करुन चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणात आता भोलेबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.