Saif Ali Khan : बॉलिवूड आणि स्टारकिड्स यांच्या चर्चा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबत एक आणखी विषय आहे ज्याची कायम चर्चा सुरु असते. ती म्हणजे नेपोटिजम म्हणजेच घराणेशाही. या सगळ्याची सुरुवात गेल्या काही वर्षांपासून सुरु झाली आहे. त्या स्टारकिड्समध्ये तैमूर आणि जेह यांची देखील नावं आहेत. तैमूरनं तर काहीही केलं तरी देखील सोशल मीडियावर तो चर्चेत असतो.  दरम्यान, आता करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैमूर आणि जेह यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता ही कोणत्याही सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. या दोघी स्टारकिड्सना जितकी लोकप्रियता मिळाली आहे तितकी लोकप्रियता ही काही कलाकारांना देखील मिळत नाही. मुलांना मिळणाऱ्या या अटेंशनवर आता करीना आणि सैफनं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. स्टारकिड्सना मिळणाऱ्या या अटेंशनवर वक्तव्य करत करीना आणि सैफ म्हणाले की त्याचं कारण लोकांना त्यांच्यात रस आहे. 


स्टारकिड्सनां चित्रपटसृष्टीत सुरुवात करणं सोपं का होतं याविषयी सांगत सैफनं उदाहरण दिलं की 'प्रेक्षक आणि लोक स्टारकिड्समध्ये इतका रस घेतात. उदाहरण म्हणून आर्चीजचे कलाकार घ्या. लोक यांच्याविषयी किती बोलतात. त्यांचे लागोपाठ फोटो क्लिक करतात, त्यांना सतत फॉलो करण्यात येतं. जर उद्या त्यांच्यातलं कोणत्या व्यक्तीसोबत चित्रपट करायचा असेल, तर त्यातं कोणतंही रॉकेट सायन्स नाही, कोणाला ना कोणाला नक्कीच करायचा असेल. तुम्हाला हे ठरवावं लागेल की त्यांना हे अटेंशन का मिळतंय आणि कोण देतंय.'  


सैफनं त्याचं उदाहरण देत सांगितलं की लोकांना स्टारकिड्सचं वेड लागलंय. तो म्हणाला, तैमूर ताइक्वान्डो करत होता, तर लोकं त्याचे फोटो काढत होते. इंटरनेटवर त्याचे रील्स आहेत. आम्हाला अशी लोकप्रियता नकोय. आम्ही स्टारकिड्स बनवत नाही. आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, मात्र प्रेस, फोटोग्राफर्स आणि मग लोकं त्यांना स्टारकिड्स बनवतात. लोकांना फक्त एका स्टारकिड्ला पाहायचंय. 



सैफच्या या वक्तव्यावर करीना म्हणाली की, 'याविषयी लोकांमध्ये एक उत्साह असतो, लोकांच्या डोक्यात ही एक गोष्ट असते की हा त्या सेलिब्रिटीचा मुलगा आहे.' 


तैमुर करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण!


तैमुरच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणावर करीनानं म्हटलं की तैमूर अभिनेता होणार नाही अशी शक्यता आहे. तर सैफ म्हणाला की, सध्या त्याला एक लीड गिटारिस्ट आणि अर्जेंटीनाचा फूटबॉलपटू बनायचं आहे. त्याला अर्जेंटीनाला जायचं आहे त्याचं कारण म्हणजे त्याला फूटबॉलर व्हायचं आहे. करीना म्हणाली, तैमुरा लियोनल मेसी व्हायचं आहे. या मुलाखतीत करीना आणि सैफनं हे देखील सांगितलं की ते दोघं एकत्र प्रोजेक्ट करणार आहेत त्यासाठी ते खूप उत्सुक आहेत.