मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा काल ४८ वा वाढदिवस आहे. सैफच्या कुटुंबातील तसे सर्वच आपल्या परिचयाचे. म्हणजे आई शर्मिला टागोर, पत्नी करिना कपूर, लाडका तैमुर, बहिण सोहा अली खान या सर्वांना आपण ओळखतो. पण सैफला अजून एक बहिण असून तिच्या विषयी कोणाला अधिक माहित नाही.


इतक्या कोटींची मालकीण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबा खाना असे तिचे नाव असून ती ४२ वर्षांची आहे. बॉलिवूड आणि लाईमलाईटपासून दूर असलेली सबा २७०० कोटींची मालकीण आहे. सबा अली खान ज्वेलरी डिझाईनर असून तिचा स्वतःचा बिजनेस आहे. काही दिवसांपूर्वीच तिने डायमंड चेन सुरु केली. 


म्हणून सिनेसृष्टीपासून दूर 


भोपाळच्या औकाफ-ए-शाहीची सबा खान प्रमुख आहे. कुटुंबातील अनेकजण बॉलिवूडमध्ये कार्यरत असूनही सबाने सिनेसृष्टीपासून लांब राहणेच पसंत केले. याचे प्रमुख कारण म्हणजे तिचा लाजाळू स्वभाव. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, मी जे काम करते त्यात मी आनंदी आहे. सिनेसृष्टीत येण्याचा मी कधीही विचार केला नाही.


४२ वर्षीय सबा अजूनही अविवाहीत आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळत औकाफ-ए-शाहीची प्रमुख असल्याने सबा पतौडी घराण्याच्या संपत्तीचा लेखाजोखा ठेवते.