मुंबई : स्त्री आणि बत्ती गुल मीटर चालू या सिनेमानंतर श्रद्धा कपूर सायना नेहवालवर आधारित बायोपिकमध्ये दिसणार आहे. श्रद्धाने या सिनेमाचा लूक देखील शेअर केला होता. पण आता आलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूरने या सिनेमाचं शुटिंग थांबवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धा कपूरला डेंग्यूची लागण झाल्याच कळलं. यामुळे श्रद्धा कपूरने सिनेमाचं शुटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. खूप दिवसांपासून श्रद्धा कपूरची तब्बेत ठिक नव्हती. अखेर त्याचं निदान झालं आहे. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर श्रद्धा कपूरच्या आजाराचं निदान झालं आहे. अखेर तिने ब्रेक घेतला असून आता सायनाच्या बालपणाचे काही सीन चाइल्ड आर्टिस्टसोबत शूट केले जात आहेत. श्रद्धा कपूरच्या स्त्री सिनेमाने 127 करोड रुपये कलेक्शन केलं आहे. श्रद्धाच्या करिअरमधील ही सर्वात महत्वाची फिल्म ठरली आहे. 



सायना सिनेमाचे निर्माता भूषण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा गेल्या कित्येक दिवसांपासून सतत शुटिंग करत आहे. त्यामुळे तिला याचा त्रास झाला. या परिस्थितीत सिनेमाचं संपूर्ण यूनिट श्रद्धा कपूरला सपोर्ट करत आहे. टीम लवकरच श्रद्धाच्या तब्बेतीची माहिती देणार आहे.