मुंबई : नवोदीत अभिनेता आकाश ठोसर अल्पावधित लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलाय. मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मात्र, त्याला बॉलिवूडमधूनही मागणी होत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही जोडी पुढे आली. सैराटमध्ये आकाश ठोसरने परश्याची भूमिका साकारली होती. त्याने अभियाने छाप पाडली. आता तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा फिटनेस फंडा पाहिला तर तो आगामी कोणत्या सिनेमासाठी तयारी करीत आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून पुढे आलेल्या आकाशने कलाविश्वातच करिअर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. आकाशच्या लोकप्रियतेतही दर दिवसागणिक वाढ होत गेली. मुख्य म्हणजे तुलनेने त्याच्या चाहत्यांमध्ये महिला फॅन फॉलोअर्सचा आकडा जास्त असल्याचे दिसून येत आहे. तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या आकाशचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो जिममध्ये ट्रेनिंग घेताना दिसत आहे. त्याच्या शरीरयष्टीत बदल दिसून येत आहे.  



 
आकाश काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरी’ज या वेब सीरिजमधील एका भागात झळकला होता. ज्यामध्ये त्याने राधिका आपटेसोबत स्क्रीन शेअर केली होती.