मुंबई : सयामी खेर... जवा दिलोंकी धडकन...  शुटिंगमधून ब्रेक घेत तिनं क्रिकेटचा आनंद लुटला. सेटवर तिच्या सहका-यांनीही क्रिकेट खेळत मुड फ्रेश केला. पण सयामीचे शॉट भाव खाऊन गेले. गल्ली क्रिकेटमधले आपले शॉट्स ओके आहेत का? असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय. सयामीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनय आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टींत अभिनेत्री सयामी खेर पारंगत आहे. तिचे या व्हिडीओतील शॉर्ट्स बघून तिची तुलना क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत होत आहे. अभिनयासोबतच सयामी क्रिकेट खेळून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. 


2016 मध्ये बॉलीवूड चित्रपट 'मिर्झ्या'मधून पदार्पण करणारी सैयामी खेर महाराष्ट्रासाठी क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळली आहे. तिची खेळाची आवड आजही दिसून येते. तिच्या म्हणण्यानुसार ती अजूनही दर रविवारी क्रिकेट खेळते. राष्ट्रीय संघ निवडीसाठी बोलावूनही सैयामीने आपला निर्णय बदलला.



सैयामी एक वेगवान गोलंदाज होती आणि तिला महिला क्रिकेटच्या राष्ट्रीय संघात निवडीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र सैयामी क्रिकेट सोडून अभिनयाकडे वळली. त्याबद्दल ती म्हणाली होती की, 'मला वाटले की, मुख्य संघात निवड झाली नाही तर क्रिकेटमध्ये करिअर करण्यात काही अर्थ नाही.'



सैयामीला स्पोर्ट्स कोट्यातून मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिथून तिने थिएटर करायला सुरुवात केली. यादरम्यान ती शूटिंगसाठीही प्रयत्न करत असे. तिने नंतर मॉडेलिंग केले आणि 2015 मध्ये 'रे' या तेलुगु चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर 2016 मध्ये त्याला 'मिर्झ्या' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळाली.