मुंबई : साजीद खानवर 3 महिला कलाकारांनी आरोप केल्यावर अभिनेत्री बिपाशा बासूने यावर प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी बिपाशा बासू म्हणाली की, मी खूष आहे कारण महिलांनी साजीद खानने केलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. बिपाशाचं म्हणणं आहे की, फिल्म सेटवर महिला कलाकार आणि इतर महिला सदस्यांशी साजीदचं वागणं कायमच असभ्य राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्रा, रॅचल आणि महिला पत्रकार यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 2014 मध्ये 'हमशकल्स' सिनेमात साजिदसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने सांगितलं की, दिग्दर्शक साजिद खानने माझ्यासोबत नाही पण महिलांप्रती त्यांच वागण कायम असभ्य राहिलं आहे. 



बिपाशा बासूने ट्विट केला आहे की, मी खूष आहे की महिला या पुरूषांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. माझ्याबरोबर साजिद खान कधीच चुकीचे वागले नाहीत पण इतर महिलांशी असलेलं त्यांच वागणं खटकणारं होतं. अश्लील पद्धतीची मस्करी करत असतं.