Sakhi Gokhale : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सखी गोखलेनं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा केली. सखीला 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून लोकप्रियता मिळवली. सखीला लहानपणापासून तिची आई आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी वाढवलं. सखी लहाण असाताना मोहन गोखले यांचे निधन झाले त्यामुळे तिचा सांभाळ हा शुभांगी यांनीच केला. तर मदर्ड डे निमित्तानं सखीनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सखीनं तिच्या वडिलांच्या निधनावर वक्तव्य केलं आहे. मात्र, यावेळी तिनं असं काही तरी वक्तव्य केलं आहे ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सखी गोखलेनं ही मुलाखत लोकमत फिल्मीला दिली आहे. या मुलाखतीत सई तिच्या वडिलांच्या निधनावर बोलताना म्हणाली की, 'मी बोलतेय ते ऐकायला क्रूर वाटेल पण मी खुप नशीबवान आहे. कारण मी खूप लहान असताना बाबा गेला. तुम्ही जसे मोठे होता तशा तुमच्या त्या त्या वयातल्या आठवणी हळू हळू पुसून जातात. माझ्या त्याच्याबरोबरच्या खूप अशा आठवणी नाहीयेत. मी तेव्हा खूप लहाण म्हणजेच 6 वर्षांची होते. त्यावेळी तो इतकं काम करायचा की माझ्या जवळ नसायचा तर आई असायची. त्यामुळे मला आईची सवय होती. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं त्या लोकांसाठी कठीण जातं जे थोड्या मोठ्या वयात आई-वडिलांना गमावतात. हे खरंतर खूप अवघड आहे. कारण आई-वडिलांना गमावणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे मी नशिबवान आहे कारण तो अशा काळात गेला जेव्हा माझा मेंदू पूर्ण तयारच झालेला नव्हता. मला माहीतच नाहीये की वडील असणं काय असतं. म्हणून ते चांगलं आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे बाबा नसल्यानंतर कसं सगळं झालं याविषयी सांगताना सखी म्हणाली, 'बाबा नसला तरी माझे आजोबा आमच्यासोबत येऊन राहिले होते. आईचे मित्रमैत्रिणी आहेत आणि खूप चांगली लोकं आमच्याशी जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधी तसं जाणवूचं दिलं नाही. सगळेच फादर फिगर्स होते आणि आहे त्या महिलांनी वडिलांची भूमिका निभावली. काही बोलायचं असेल तर त्या होत्या. त्यामुळे अशी काही पोकळी कधी जाणवली नाही कारण ते काय असतं ते माहीतच नव्हतं.'