Salaar OTT Release : केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा सिनेमा सालारने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. सिनेमाची कहाणी आणि एक्शनने प्रेक्षकांना खूर एंटटेन्ट केलं. या दरम्यान आता सालारच्या ओटीटी रिलीजचं वक्तव्य केलं आहे. सालार या सिनेमाचा २०२३ च्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत सामावेश आहे. रिलजच्यावेळी सालारची टक्कर शाहरुख खानच्या डंकीसोबत होती. या दोन सिनेमांच्या स्पर्धेत प्रभासच्या सिनेमाने बाजी मारली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण कोणत्या भाषेत पाहता येणार?
सालारच्या रिलीजच्या जवळपास एक महिन्यानंतर सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. मात्र सालारच्या ओटीटी रिलीजमुळे हिंदी प्रेक्षकांची निराशा होऊ शकते, कारण हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.


केव्हा आणि कुठे होणार रिलीज
'सालार'च्या मेकर्सने १९ जानेवारीला सिनेमा ओटीटी रिलीजची माहिती दिली. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. तर कौतुकास्पद म्हणजे, सालार आज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड व्यतिरिक्त, चित्रपटाच्या हिंदी डब रिलीझबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


वार मशीन आहे सालार
सालारच्या ओटीटी रिलीजची माहिती देत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीण्यात आलं आहे की,  "यहां है खानसार का सालार, वर्धाराज मन्नार का सालार और आप पहले से जानते हैं कि वार मशीन को कोई रोक नहीं सकता।"


काय आहे सालारची स्टोरी
सालार या सिनेमात प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रुति हासन, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, टीनू आनंद आणि जगपति बाबू अहम यांनी या सिनेमात महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. सिनेमाची कहाणी बद्दल बोलायचं झालं तर, हा सिनेमा खानसरच्या काल्पनिक शहरावर आधारित आहे आणि दोन मित्र देवा आणि वर्धा यांच्या आजूबाजूला फिरताना दिसतेय.


प्रभासचा सालार चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. रिलीजआधीपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. आता रिलीजनंतर होवून जवळपास १ महिना झाला आहे तरी देखील  या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाहीये.  चित्रपटगृहात धमाका केल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.