Salaam Bombay: आजपर्यंत आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक नामवंत चित्रपट होऊन गेले ज्यांनी राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले चांगले नाव कमावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील असा एकाही चित्रपट नसेल ज्यात आपल्या भारतीय चित्रपटांनी इतिहास रचला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चित्रपटांनी पुष्कळ नामवंत पुरस्कारही (International Awards) कमावले आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या अशा ऑस्कर पुरस्कारासाठी तर अनेक भारतीय चित्रपटांना नामांकनही मिळाले आहे. त्यातून सर्वांत जास्त अभिनाची बाबा होती जेव्हा आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या लगाना या चित्रपटाला ऑक्सर नामांकन प्राप्त झाले होते. तेव्हा भारतीय चित्रपटांनी मारलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील डंका कौतुकास्पद होता. यापुर्वीही मदर इंडिया (Mother India) या चित्रपटानं इतिहास रचला होता. (salam bombay child actors what are they doing now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी चित्रपटसृष्टीतील श्वास या चित्रपटानंही ऑक्सर पुरस्कार सोहळ्याची पायरी चढली होती. परंतु या सगळ्यात अजून एक महत्त्वाचा चित्रपट होता तो म्हणजे सलाम बॉम्बे. या चित्रपटावरून 1988 साली अनेक वादांनाही सामोरे जावे लागले होते त्यामुळे सगळीकडेच तेव्हा या चित्रपटाचीच चर्चा होती. हा चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत आला होता. तेव्हा हा चित्रपट ऑक्सर पुरस्कार मिळवेल अशी अनेकांना आशा होती. लगान, सलाम बॉम्बे आणि मदर इंडिया या चित्रपटांचे हुकलेले स्वप्न अखेर 2008 साली संपन्न झालेल्या ऑस्कर सोहळ्यात स्लमडॉग मिलियनेयर (Slumdog Millionaire) या चित्रपटानं पुर्ण केलं. परंतु हा भारतीय दिग्दर्शकानं केलेला चित्रपट नव्हता परंतु मुळ कथा, कलाकार आणि गोष्ट ही भारतीय होती त्यामुळे भारतीयां कलासृष्टीसाठी तो एक गगनात मावेनासा आनंद होता.


सलाम बॉम्बे हा चित्रपट आजही अनेकांच्या पसंतीचा आहे. हा चित्रपट लोकप्रिय दिग्दर्शिक आणि आतंरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखिका मीरा नायर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Pateakr) आणि अभिनेता इरफान खान (Irfan Khan)यांनी महत्त्वपुर्ण भुमिका बजावल्या होत्या. त्यांच्या भुमिकांचे आजही कौतुक केले जाते. इरफान खानच्या करिअरच्या सुरूवातीचा हा चित्रपट होता परंतु त्यात त्यानं केलेली भुमिका ही आजही अनेकांच्या लक्षात राहणारी आहे. 


या चित्रपटातील कथा होती ती त्या तीन-चार बालकारांभोवती. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या जीवनाचे झळझळीत वास्तव त्या चित्रपटात होते. त्यातील मध्यवर्ती भुमिका होती ती चायपॉंव या व्यक्तिरेखा नामक अभिनेते शाफिक सईद यांची. पण तुम्हाला माहितीये का की शाफिक हे एक रिक्षा चालक आहेत. त्यांनी सलाम बॉम्बे हा चित्रपट झाल्यानंतरही रिक्षा चालवणे पसंत केले.



त्यांनी त्यापुढे आपले चित्रपट करिअर गाजवले नाही. त्यांनी हेच आपले काम पुढे नेले. तर शाफिक यांच्यासोबत चिल्लीम यांची भुमिका केलेले अभिनेते आज ओटीटी स्टार आहेत. तुम्ही रघुबीर यादव (Raghvir Yadav) यांचे नाव ऐकलेच असेल त्याची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही.