मुंबई : आज बॉलिवूडप्रमाणे आपण मराठी सिनेसृष्टीत देखील वेगवेगळे बदल होताना आपण पाहतो. अनेक कलाकार आज आपल्या सिनेमात गाणं गाताना आपण पाहतो. तर अनेक संगीतकार अभिनय करताना पाहतो. असाच एक आपला संगीतकार मित्र दिग्दर्शन करतना लवकरच पाहणार आहे. एक असा संगीतकार ज्याने गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ आपल्या संगीतातून, आवाजातून रसिक प्रेक्षकांना आनंद दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती आहे संगीतकार सलील कुलकर्णी. सलील लेखक म्हणून आपल्यासमोर 'लपवलेल्या काचा' आणि 'शहाण्या माणसांची फॅक्टरी' ही दोन सुंदर पुस्तकं लिहिली आहेत.  त्याचप्रमाणे, स्तंभलेखन आणि झी मराठीवरील 'मधली सुट्टी' या कार्यक्रमांत त्यांनी लिहिलेल्या गोष्टी सुद्धा रसिकांच्या पसंतीस उतरल्या. आता सिनेमातून लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सलील कुलकर्णी आपल्यासमोर येत आहे.


ऑक्टोबरपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होत आहे. 'वेडिंगचा शिनेमा'  हे या सिनेमाचं शीर्षक आहे . २०१९ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक दिग्दर्शकांबरोबर त्यांच्या सिनेमांसाठी काम केलंय, त्याचा फायदा नक्कीच झाला, असं सलील सांगतात.  गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जे काही केले ते नक्कीच वेगळे केले.अगदी बालगीतांपासून,अभंग आणि अभिजात कवितांपासून लावणीपर्यंत सर्व प्रकारची गाणी रसिकांना दिली आणि त्यांनीही त्या सर्वच गीतांना भरभरून प्रतिसाद दिला. आता आणखी एक नवी वाट चोखाळत असल्याचं सलील यांनी सांगितलं.