मुंबई : 'सावधान इंडिया' आणि 'सीआयडी' या दोन लोकप्रिय हिंदी मालिकांचे दिग्दर्शन करणार्‍या सलील सिंगचे अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलील हा निर्माते बी.पी.सिंग यांचा मोठा मुलगा आहे.  सलीलने सीआयडीच्या काही भागांचे दिग्दर्शन केले आहे. सध्या सलील 'सावधान इंडिया' या मालिकेचे दिग्दर्शन करत होता. 


'सावधान इंडिया'च्या सेटावरच सलील यांचे निधन झाले. त्यांना रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. 


'सावधान इंडिया' च्या सेटवरील कलाकारांच्या माहितीनुसार सलीला दिवसभर कोणताच त्रास नव्हता. त्यांची प्रकृती उत्तम होती. या दिवशी सलीलची पत्नीही सेटवर आली होती. 


चित्रीकरणादरम्यान सलीलने काही वेळ सहकार्‍यांना ब्रेक दिला होता. या वेळेत ते बाथरूमला गेले होते. बराच वेळ सलील बाहेर न आल्याने त्यांना काळजी वाटायला लागली. त्यानंतर साथीदारांना बाथरूममध्ये 
कोसळलेले आढळले. लगेजच सलीलना मिरा रोड येथील ऑर्किड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.