सलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का
Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार
Salim Khan Buys New Car : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सलमान खान आणि त्याचं कुटुंब हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गॅंगस्टर लॉरेंस बिष्णोई सतत सलमान आणि त्याच्या कुटुंबाला धमकी देताना दिसत आहेत. सलमान खानच्या जवळचे व्यक्ती असलेले राजकारणी बाबा सिद्दीकी यांची याच लॉरेंस बिष्णोई गॅंगनं हत्या केली. आता त्यांनी फक्त सलमान आणि त्याचं कुटुंब नाही तर त्यांच्या आजुबाजूच्या लोकांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. आता या सगळ्या येणाऱ्या धमक्या पाहता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एक लग्झरी कार खरेदी केली आहे. त्यांनी ही कार धनतेरसच्या निमित्तानं खरेदी केली.
सलमान खानचे वडील सलीम खान यांना बिष्णोई गॅंग सतत धमकी देताना दिसत आहे. सगळ्यात पहिले त्यांना ही धमकी सलीम खान हे पार्कात मॉर्निंग वॉक करत असताना त्या दरम्यान, ते बेंचवर बसले असता तिथे चिठ्ठी ठेवत त्यांना धमकी दिली. तेव्हा पासून त्यांना सतत धमकी मिळत आहेत. दरम्यान, हे सगळं पाहता सलीम खान यांनी Mercedes Benz GLS ही नवी कार खरेदी केली आहे. त्यांची ही गाडी काल वांद्रेत असलेल्या घराच्या बाहेर स्पॉट झाली. गाडीविषयी जी माहिती रिपोर्ट्सनुसार समोर आली त्या गाडीची किंमत ही 1.32 कोटी आहे. या नव्या गाडीची पूजा करण्यात आली. तर असं म्हटलं जातं की सलमान खाननं दुबईहून एक्सचेंजमध्ये 2 कोटीची बुलेटप्रु निसास पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली होती.
रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकीला जिवेमारण्याची धमरी मिळाली. तर त्यांना धमकी देणारा आरोपी हा नोएडाचा राहणारा आहे आणि त्याचं वय हे 20 वर्ष आहे. पोलिसांप्रमाणे आरोपीनं फोनवर जीशानला जिवेमारण्याची धमकी दिली आणि प्रकरण जर थांबवायचं असेल तर पैशांची मागणी केली आहे.
हेही वाचा : आदित्यसोबतच्या ब्रेकअपनंतर अनन्या पांडे मॉडेलच्या प्रेमात! I Love You म्हणतं त्यानं जगजाहीर दिली कबुली
काळवीट प्रकरणात गॅंगस्टर बिष्णोईनं सलमान खानला माफी मागण्यास सांगितलं. अनेकदा बिष्णोई समाजानं हे केलं. मात्र, काळवीट शिकार प्रकरणात सलीम खान यांनी सांगितलं की त्यांच्या मुलानं काहीही केलेलं नाही, तर तो माफी का मागेल. बिष्णोई समाजानं का साधलाय सलमानवर निशाणा, तर त्याचं कारण असं आहे की बिष्णोई समाजात काळवीटला खूप जास्त महत्त्व आहे.