मुंबई : बॉलिवूड स्टार कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी नुकतेच शाही पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या खूप आधीपासून या रॉयल वेडिंगच्या बातम्यांचा बोलबाला होता. संपूर्ण इंडस्ट्रीतील स्टार्सनी दोघांचे अभिनंदन केले. आणि भेटवस्तू देखील पाठवल्या. अशातच सलमानच्या वडिलांनी या लग्नावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान आणि कतरिना कैफच्या रिलेशनशिपबाबत खूप चर्चा रंगली. पण अखेर कतरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत सात फेरे घेतले. या लग्नावर अभिनेता सलमान खानच्या वडिलांनी दिग्दर्शक सलीम खान यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे #VicKat च्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. 


सलमानच्या वडिलांची मोठी नाराजी 


लग्नाचे विधी संपून बरेच दिवस उलटून गेले आहेत, मात्र आतापर्यंत लग्नाचे फोटो हळूहळू प्रसिद्ध होत आहेत. त्याचवेळी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या लग्नाबाबत मौन तोडले आहे. नुकतेच मीडियाशी झालेल्या संवादात विकी-कतरिनाच्या लग्नाची चर्चा रंगली तेव्हा त्यांनी या प्रकरणावर मौन सोडले. ते म्हणाले की, यावेळी सर्वजण फक्त त्यांच्याबद्दलच बोलत आहेत. मीडियाकडे विकी-कतरिनाच्या लग्नाशिवाय दुसरा मुद्दा नाही.


काय आहे नाराजीचं कारण?


लग्नाची बातमी समोर आल्यापासून ते कायम चर्चेत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की सलीम आपल्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नाच्या बातमीने संतापले आहेत. त्याचवेळी मीडियाच्या अवाजवी कव्हरेजमुळे देखील ते संतापल्याचे काहींना वाटते. सोशल मीडियावर सलीम खान यांच्या वक्तव्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच वेळी, काही लोक त्यांच्या नाराजीला पूर्णपणे समर्थन देत आहेत.


विकी - कतरिनाच सिक्रेट लग्न


विकी - कतरिनाचं लग्न हे अत्यंत गुप्त पद्धतीने झाले आहे. येथे येणाऱ्या पाहुण्यांना विधी दरम्यान फोन किंवा कॅमेरा नेण्याची परवानगी नव्हती. विक्की कतरिनाने या लग्नातील फोटो आणि व्हिडिओसाठी 80 कोटींची डील केली होती.