नवी दिल्ली : गेल्या कित्येक दिवसांपासून फक्त संजय लीला भन्साळी सिनेमाची जोरदार चर्चा होती. पण आता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा सिनेमा १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता प्रेक्षकांची हिरमोड झाली असून आता साऱ्यांचे लक्ष हे सल्लूच्या लग्नाकडे लागले आहे. 


'सल्लू की शादी' याचा अर्थ तुम्ही जर सलमान खानच्या लग्नाशी जोडत असाल तर जरा थांबाच. 'सल्लू की शादी' हे एका सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. जरी सलमान खानचं लग्न होवो न होवो पण हा सिनेमा त्याच्या लग्नाशी जोडला गेलेला आहे.  हा सिनेमा लहान बजेटचा असून त्याच्या पोस्टरवर सलमान खानचं नाव देखील नाही. मात्र वधुच्या मेंहदी लावलेल्या हातावर आणखी एक हात आहे. ज्यावर ब्रेसलेट आहे. जे कायम सलमान खानच्या हातात असतं. 


पोस्टरवर लिहिलं आहे की, जोपर्यंत भाईजान लग्न करणार नाही तोपर्यंत मी देखील लग्न करणार नाही. सिनेमांत रवी पांडे आणि अर्शीन मेहता यांची मुख्य भूमिका आहे. मोहम्मद इसरार अंसारी दिग्दर्शित हा कॉमेडी सिनेमा आहे. 



दिग्दर्शकाचं असं म्हणणं आहे की, खूप लोकांचं असं म्हणणं आहे की, सलमान खानचं लग्न झाल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही. सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाबाबत कोणतीही गोष्ट ऐकली नाही. म्हणून हा सिनेमा सलमान खान आणि त्यांच्या फॅनला डेडिकेट केला आहे. या सिनेमाचा पोस्टर येताच सलमानच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली होती.