मुंबई : बॉलीवूड 'दबंग' सलमान खानचा भाऊ अरबाज खान सट्टेबाजी प्रकरणात अडकलाय. ठाणे गुन्हे अनवेशण विभागाच्या कार्यालयात झालेल्या चौकशीत त्याने सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. यात २.७५ कोटी रुपये हरल्याचंही तो म्हणालाय.. आयपीएल मॅचेसवर आत्तापर्यंत सहा वेळा सट्टा लावल्याची कबुली आरबाज खान याने दिली आहे. अरबाज आणि सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान यांची एकत्र चौकशी करण्यात आली. दरम्यान सलमान खानची या संपूर्ण प्रकरणात कोणतीही प्रतिक्रीया आली नव्हती. आता सलमान खान या प्रकरणावर बोलता झालाय. माणसाच्या आयुष्यात वेगवेगळी परिस्थिती येत असते पण आपल्याला त्याच्याशी झगडावेच लागते असे सलमान खानने म्हटलेय.


सलमानची चिंता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खानला माफीचा साक्षीदार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्याला अटक होणार नाही. तरीही त्याच्यावर सट्टेबाजी प्रकरणाची तलवार कायम आहे. 'या घडामोडी सुरू असतानाा मी 'रेस ३' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होतो. अशावेळी तुम्हाला सर्व दु: ख विसरावे लागते आणि आनंदाने जगाला सामोरे जावे लागते. काही प्रसंग आयुष्यात असे येत की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाहीत.' अशा शब्दात सलमानने आपली चिंता व्यक्त केली. 


सट्टेबाज आणि बॉलिवूड कनेक्शन 


सट्टेबाजीप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं हे समन्स बजावलं होतं.  सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान याला ठाणे गुन्हे शाखेनं आयपीएलवर सट्टा लावल्याप्रकरणी अटक केली होती. सोनूच्या चौकशीत सट्टेबाज आणि बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. अरबाजसोबतच याप्रकरणी निर्माता पराग संघवी याचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अजून तीन चित्रपट निर्माते पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे.