मुंबई : 'सुल्तान','टायगर झिंदा है' नंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक 'अली अब्बास जफर' ही जोडी बॉक्सऑफिसवर आता 300 कोटीची कमाई करण्याची हॅट्रिकच्या तयारीत आहे.  'रेस 3' या चित्रपटानंतर सलमान खान लवकरच 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. या सिनेमाच्या शूटींगसाठी सलमान खान लंडनला जाणार होता पण आता असं होणार नाही. हे लोकेशन बदलण्याचा विचार सुरू आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमान सध्या जामिनावर आहे. तो कोणत्याही युरोपियन देशात त्याला शूटींग करण्याची परवानगी नाही.


पंजाबमध्ये होणार शूटींग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत परफॉर्म करण्याची सलमानला परवानगीही मिळाली होती. 'भारत'ची शूटींग लंडनमध्ये होणार होती. स्पेन, पोर्तुगाल आणि पोलंडमध्ये स्टंट होणार होते. पण सलमानसाठी सध्या तरी हे कठीण दिसतयं. सिनेमाचे पहिले शेड्यूल्ड पंजाबमध्ये शूट होणार असल्याचे सांगण्यात येतंय.


कोरियन सिनेमाचा रिमेक


'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. 'भारत' या चित्रपटाला भारत- पाकिस्तान फाळणीची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटाची कथा देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार्‍या एका मुलाच्या जिद्दीची कथा आहे. यामध्ये भारत पाकिस्तान फाळणीची कहाणी असून भारताचा ७० वर्षांचा इतिहास असणार आहे. अली अब्बास आणि सलमान यांच्या जोडीचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी या जोडीन 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. २०१९ साली भारत रिलीज होणार आहे. खूप मोठ्या काळानंतर प्रियांका चोप्रा या सिनेमातून समोर येणार आहे.