सलमान ऐश्वर्याच्या शेवटच्या चित्रपटाला 22 वर्ष पूर्ण; या कारणामुळे कधीच दिसणार नाहीत एकत्र
का दिसणार नाहीत ऐश्वर्या आणि सलमान एकत्र?
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भंसाळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम (Hum Dil De Chuke Sanam)'चित्रपटाला आज 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) और अजय देवगन (Ajay Devgan)स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला होता. चित्रपटाला 22 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अभिनेता अजय देवगनने चित्रपटासंदर्भातील काही फोटो शेअर केले आहेत.
अजय देगगनला काधीही वाटलं नाही की हा चित्रपट एक इतिहास रचेल. फोटो शेअर करत अजयने कॅप्शनमध्ये 'सलमान. संजय ऐश आणि मला ठाऊन नव्हतं हा चित्रपट एक इतिहास रचेल.' असं लिहित हात जोडलेला इमोजी देखील पोस्ट केला आहे.
'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाने इतिहास रचला पण याचं चित्रपटाच्या सेटवरून सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याची सुरूवात झाली. चित्रपटातील त्यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. सलमान-ऐश्वर्या यांच्यात प्रेमाचा गुलाब बहरल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनीचं दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
सलमान-ऐश्वर्याचं नात फार काळ टिकू शकलं नाही. अखेर ते वेगळे झाले. त्यानंतर ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. सलमान आणि ऐश्वर्याचं नातं संपल्यानंतर दोघे कधीही एकत्र दिसले. कोणत्या चित्रपटात देखील त्यांनी एकत्र केलं नाही.
सांगायचं झालं तर, 22 वर्षांनंतर संजय आणि अजय एकत्र दिसणार आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. 'गंगूबाई काठुयावाडी' चित्रपटाच्या माध्यमातून हे त्रिकूट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या 'गंगूबाई काठुयावाडी' चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगत आहे.