Salman Khan Kiss Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जणू या चित्रपटानं थिएटरमध्ये प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. चित्रपट चांगल प्रदर्शन करत असताना निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटातील स्टारकास्ट आणि चाहत्यांसाठी एका प्रेस मीटचं आयोजन केलं. या कार्यक्रमात सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता इमरान हाश्मी दिसला. त्यावेळी कतरिनासमोर सलमाननं इमरानच्या किसिंग स्टाईलची नक्कल केली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल शुक्रवारी सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या दरम्यान, एक लेटेस्ट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सलमान खान कतरिना कैफसमोर इमरानची किसिंग स्टाइल कॉपी करतो. खरंतर हा कार्यक्रम यशराज फिल्म्सनं आयोजित केला होता. त्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



या व्हिडीओत सलमान बोलताना दिसतो की 'कारण चित्रपटात कतरिना आहे तर टायगर आणि झोयामध्ये थोडा रोमान्स होणारच. पण जर इमरानची आतिश ही भूमिका नसती तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की हे तर नक्कीच झालं असतं.' हे बोलल्यानंतर व्हिडीओत सलमान खान हा इमरानकडे जातो आणि त्याला मिठी मारतो आणि मग किस करण्याचा अभिनय करतो. हे पाहताच तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हसू लागले. त्यानंतर सलमान बोलताना दिसतोय की माझी तर ही सवय नाही (किसिंग सीन देण्याची), पण मला वाटतं की त्याची सवय हळूहळू सुटते. सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 


हेही वाचा : Box Office Collection Day 6 : सहाव्या दिवशी कमी प्रतिसाद मिळूनही Tiger 3 नं बॉक्स ऑफिसवर पार केला 200 कोटींचा टप्पा


या कार्यक्रमातील काही व्हिडीओ यशराज फिल्म्सनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात सलमान आणि कतरिना हे दोघं 'लेके प्रभू का नाम' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. विकेंड सुरु झालेला असताना आता प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल.