Box Office Collection Day 6 : सहाव्या दिवशी कमी प्रतिसाद मिळूनही Tiger 3 नं बॉक्स ऑफिसवर पार केला 200 कोटींचा टप्पा

Tiger 3 Box Office Collection Day 6 : 'टायगर 3' या चित्रपटाला सहाव्या दिवशी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी चित्रपटानं पार केला 200 कोटींचा टप्पा पार

दिक्षा पाटील | Updated: Nov 18, 2023, 10:56 AM IST
Box Office Collection Day 6 : सहाव्या दिवशी कमी प्रतिसाद मिळूनही Tiger 3 नं बॉक्स ऑफिसवर पार केला 200 कोटींचा टप्पा title=
(Photo Credit : Social Media)

Tiger 3 Box Office Collection Day 6 : विकेंडची सुरुवात ही कालपासूनच झाली आहे. या सगळ्यात चित्रपटगृहात चांगलीच गर्दी होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट थिएटरमध्ये आहे. त्यामुळे विकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करणार अशी आशा सगळ्यांना लागली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 6 व्या दिवशी 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री करेल. जाणून घेऊया 6 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. 

भारतात 'टायगर 3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटानं सुरुवातीचे तीन दिवस बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या या चित्रपटानं चांगलीच कमाई केली. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घट झाली. त्याच्या मागोमाग चित्रपटानं पाचव्या दिवशी देखील कमी कमाई केली.  त्यादिवशी या चित्रपटानं एकूण 188.25 कोटींची कमाई केली. तर सैकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, सहाव्या दिवशी फक्त 13 कोटींची कमाई केली आणि या कमाईनंतर या चित्रपटानं 200 कोटीचा टप्पा पार केला आहे. 

कशी झाली कमाई?

पहिल्या दिवशी : 44.5 कोटी 
दुसऱ्या दिवशी : 59.25 कोटी 
तिसऱ्या दिवशी : 44.75 कोटी 
चौथ्या दिवशी : 21.25 कोटी 
पाचव्या दिवशी : 18.50 कोटी 
सहाव्या दिवशी : 13 कोटी 

हेही वाचा : 'टायगर 3' नाही तर कतरिना कैफ चर्चेत येण्याचं 'हे' ठरलय कारण

दरम्यान, सहाव्या दिवशी 'टायगर 3' नं भारतात 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर पाचव्या दिवशी या चित्रपटानं वर्ल्डवाईड 300 कोटी कमाई केली. पाचव्या दिवशी या चित्रपटानं भारता बाहेर 71 कोटींची कमाई केली. टायगर या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय इम्रान हाश्मीहा खलनायकाच्या भूमिकेत आहे. तर या चित्रपटात एक भारतीय स्पाय कशा प्रकारे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जीव वाचवण्यासाठी खूप मेहनत करतो. त्यावेळी त्याच्या मदतीसाठी पठाण धावून येतो. हे सगळं पाहणं खूप मजेशीर आहे. 'टायगर 3' हा चित्रपट यशराज स्पाय यूनिव्हर्समधील 5 वा चित्रपट आहे. 'टायगर 3' या चित्रपटानंतर 'वॉर 2' आणि 'टायगर वर्सेस पठाण' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.