मुंबई : एकेकाळी सलमान खानसोबत हिट सिनेमा देणारी अभिनेत्री अचानक या ग्लॅमरस जगापासून लांब गेली. पण या अभिनेत्री 'मैने प्यार किया' हा सिनेमा आजही प्रेक्षकांचा फेव्हरेट आहे. ही अभिनेत्री आहे भाग्यश्री. संपूर्ण सिनेसृष्टीपासून लांब असलेली ही अभिनेत्री आता आपल्या मुलासोबत दिसली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी आईच्या पावलांवर पाऊल ठेवताना दिसत आहे. अभिमन्युने देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे. अभिमन्युने बॉलिवूडमध्ये 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमापासून एन्ट्री केली आहे. रोमान्स आणि अॅक्शनने भरलेला असा हा सिनेमा. 




हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अजून वेळ आहे. मात्र आता हा सिनेमा वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. गेल्या महिन्यात 'टोरंटो आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव' (TIFF) मध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर आता हा सिनेमा 'जियो मामी मुंबई फेस्टिवल' (MAMI 2018) मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे.