मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) स्टारर 'वीर' सिनेमातून अभिनेत्री झरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'वीर' सिनेमातून झरीनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमात साधी-सरळ दिसणारी झरीनने 'वीर'नंतर अनेक बोल्ड भूमिका साकारल्या ज्यामुळे ती तुफान चर्चेत आली. आता पुन्हा झरीन एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या झरीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये झरीन एका मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये झरीनसोबत दिसणारा मिस्ट्रीबॉय दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे. झरीनच्या बॉयफ्रेंडचं नाव शिवाशीष मिश्रा (Shivashish Mishra) आहे.  झरीन बॉयफ्रेंडसोबत वांद्रे येथील टोरी रेस्टोरेंटमध्ये दिसली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोणी आहे शिवाशीष मिश्रा? 
शिवाशिष मिश्रा हा इंदूरचा रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड होती, त्यामुळे त्याने बॉडी बनवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर ‘मिस्टर इंदूर’ आणि ‘मिस्टर मध्य प्रदेश’ हा किताब पटकावला. दणकट शरीरामुळे शिवाशिष मॉडेल बनला.


याशिवाय शिवाशिषने अभिनयातही नशीब आजमावला आहे. शिवाशिषला 2017 मध्ये मालिका 'संकट मोचन हनुमान'मध्ये नीलच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु तो मालिकेत अधिक दिवस दिसला नाही. काही दिवसांनंतर त्याने मालिका सोडली.