मुंबई : मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनावेळी बॉलिवूडचे सगळे कलाकार तिथे उपस्थित होते.  यावेळी या कार्यक्रमात आलिया भट्ट, सलमान खान, शाहरुख खान रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, असे अनेक बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमावेळचा एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहीजण खूप हा व्हिडिओ खुश होत आहेत तर काही चाहते मात्र हा व्हिडिओ पाहून नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडिओ सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा आहे. ज्यामध्ये हे दोन कलाकार एकत्र पोज देताना दिसत आहेत. एवढंच नव्हेतर तर ऐश्वर्या सलमान खानचं ब्लेजरही नीट करताना दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहे. 


मात्र 20 वर्षांनंतर एकत्र दिसलेल्या दोघांच्या या व्हिडिओचे संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घेऊया. सलमान खान आणि ऐश्वर्या रायला असं एकत्र पाहून चाहते खुश होत असेल तरी हा त्यांचा खरा व्हिडीओ नाही. हा एडिट केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र हे एडिटिंग इतकं जबरदस्त आहे की खरंच हे दोघं एकत्र आलेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला. फोटोशॉप केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.


सलमानने शाहरुखच्या फॅमिलीसोबत पोज दिली
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हा व्हिडिओ एडिट करणाऱ्याचं कौतुक करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, खरंतर सलमान खानचा हा व्हिडिओ NMACC कार्यक्रमात शाहरुख खानच्या कुटुंबीय गौरी, सुहाना आणि आर्यन खानसोबत पोज दिली होती आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. तर ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्यासोबत पोज दिली. हे दोन्ही व्हिडिओ एकत्र करुन या दोघांचा एकत्र व्हिडिओ एडिट करुन तयार करण्यात आला. ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमान आणि ऐश्वर्याचे 2002 मध्ये ब्रेकअप 
एक काळ असा होता की, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बॉलिवूडच्या सुंदर रोमँटिक कपल्सपैकी एक मानली जात होती. जवळपास 2 वर्षे डेट केल्यानंतर दोघांचे 2002 मध्ये ब्रेकअप झालं.