Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामुळे चर्चेत असणार सलमान हा आता त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. खरंतर सलमान हा अनेक नवीन कलाकारांना त्याच्या चित्रपटांमध्ये संधी देताना दिसतो. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात त्यानं शहनाज गिल आणि पलक तिवारीला संधी दिली आहे. फक्त त्यांनाच नाही तर या आधी देखील अनेक कलाकारांना सलमाननं त्याच्या चित्रपटात संधी दिली होती. पण सलमान अनेक सेलिब्रिटींच करिअर खराब करतो किंवा कलाकारांना काम मिळू देत नाही असा आरोप नेहमीच त्याच्यावर करण्यात येतो. त्यावर आता सलमाननं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमाननं नुकतीच इंडिया टीव्हीच्या 'आप की अदालत' ला दिलेल्या मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे.  या मुलाखतीत सलमानला कलाकारांचं करिअर संपवण्याच्या आरोपावर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. यावेळी सलमान म्हणाला, 'मी स्वत: चित्रपटसृष्टीशी जोडलेला नाही. चित्रपटसृष्टीत मी ज्यांच्यासोबत काम करतो, त्यांच्यासोबतच शूटिंगच्या वेळी बोलतो. असं कधी झालं नाही की रोज पार्टी आहे आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. जे आहेत ते लहाणपणीचे मित्र आहेत किंवा मग सीनियर्स आहेत.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे सलमानला इतर कलाकारांसोबत असलेल्या नाराजीवर विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, 'नाही. माझ्यात तो गुण नाही. नशेत असताना लोक म्हणतात, मी त्याला सोडणार नाही, पण जेव्हा मी पितो तेव्हा बोलतो, सोड यार. जाऊ दे मी तसा नाही पण कधी कधी काही चुकी होतात. (कभी-कभी बहक जाता हूं). आयुष्य खूप छोटं आहे, का डोकं फोडावं.


सलमान खान पुढे टॉपच्या प्रोड्युसरसोबत काम करण्यावर म्हणाला, मी अजून स्वत: ला सेट करू शकलो नाही. इतक्या वर्षांनंतर आदित्य चोप्रासोबत काम केलं. आता करण जोहरचा फोन आला की एक चित्रपट आहे. हे सगळं गेल्या 8-10 वर्षांमध्ये घडलं आहे. त्या आधी मला कोणी विचारत नव्हतं. 


हेही वाचा : सेटवर महिलांच्या कपड्यांवर असलेल्या नियमावर Salman Khan नं सोडलं मौन, म्हणाला...


याशिवाय सलमान पुढे त्यानं लग्नाचा नाही तर मुलांचा विचार केल्याचं म्हटलं होता. त्यानं या मुलाखतीत पुढे सांगितलं की त्याला करण जोहरसारखं वडील व्हायची इच्छा होती. पण त्यानंतर कायदे बदलले आणि ते शक्य झालं नाही.