'Cat-porate' Culture: या देशात मांजरींना नोकरी, वेगळी केबिन आणि कार्यालय! नेमकं काय करतात?

असे काही देश आहेत जेथे मांजरींना देव मानले जाते. त्यांची पूजा केली जाते. अशा देशांबद्दल ऐकलं असेल. मात्र मांजरी संगणकावर काम करतात असे कधी ऐकले नसेल.जगात अशी कार्यक्षेत्रे आहेत जेथे मांजरी कर्मचारी म्हणून कार्यरत असतात.  

Sep 23, 2024, 16:50 PM IST

मांजरींवर प्रेम करणारे बरेच दिसतात. पण मांजरी ऑफीसला जातात. असे कधी ऐकले आहे का? 

1/7

मांजर

'मांजर' हा तसा फार लोकप्रिय प्राणी आहे. लोकांना कुत्रा, मांजर घरात पाळायची फार हाऊस असते. लोकांना या प्राण्यांचा एवढा लळा आसतो की, ते स्वतःला 'कॅट लव्हर', 'डॉग लव्हर' अशा उपमादेखील देतात. आजकाल या प्राण्यांसाठीसूद्धा पाळणाघरे असतात. आतातर ज्यांच्याकडे मांजरी आहेत, असे लोक एकत्र येऊन 'कॅट लव्हरर्स ग्रुप' वगैरे नावाचे गट तयार करतात. आणि एकत्र येऊन प्राण्यांसाठी कार्यक्रम, खेळ आदींचे नियोजन करतात.

2/7

कॅट पॅरेंटस्

बऱ्याच ठीकाणी मांजरी पाळणारे लोक स्वतःला 'कॅट पॅरेंटस्' म्हणतात. मांजरींना स्वतःच्या पाल्याप्रमाणे वाढवतात. तर बऱ्याच घरात उंदरांचा शिरकाव होऊ नये, म्हणून मांजरी पाळतात. भारतात आपण मांजरींना उंदीर हकलायचे काम देतो, पण 'जपान'सारख्या देशात मांजरींना चक्क कार्यालयांत कामाला ठेवले जाते. 

3/7

मांजरी करतात काम

हे काम उंदीर हकलायचे नसून, माणसांप्रमाणेच विविध पदव्यांवर या मांजरींची नियुक्ती केली जाते. ऐकून खोटं वाटलं तरी, जपानमध्ये मांजरींना कार्यक्षेत्रांत मोलाचे स्थान असते. इथल्या मांजरींला कामासाठी संकणकसूद्धा दिला जातो. 

4/7

मांजरीसाठी संगणक

जपानमध्ये अशी काही ऑफीसेस् आहेत, जिथे कर्मचाऱ्यांना रीलॅक्स वाटावे, म्हणून मांजरी ठेवल्या जातात. मन रमवण्यासाठी मांजर ठेवणे यात काही नवल नाही. मात्र काही कार्यक्षेत्रे अशी आहेत, जिथे मांजरीच कर्मचारी आहेत. एवढेच नाही तर, त्यांना स्वतःचे स्वतंत्र 'केबिन' दिले जाते. तिथे बसून या मांजरी काम करतात. प्रत्येक मांजरीकडे स्वतःचा संगणक आहे. 

5/7

चेअर कॅट

या मांजरींसाठी विविध पदव्या आहेत. या पदव्यांमध्ये 'चेअर कॅट', 'मैनेजर कॅट', 'ऑडीटर कॅट', 'क्लर्क कॅट', आदी. पोस्टवर या मांजरींची नियुक्ती केली जाते. एवढचं नाही तर, ,चेअर कॅट,च्या पदाला कंपनीच्या मालकापेक्षा जास्त मान आहे.

6/7

क्यूनोट कंपनी

या कंपनीचे नाव 'क्यूनोट' आहे. या कंपनीत 32 कर्मचारी आहेत. आणि दहा मांजरी कर्मचारी आहेत. आपापल्या केबिनमध्ये या मांजरी बसतात. 2022पर्यंत या कंपनीत अकरा मांजरी होत्या. एका मांजरीचा मृत्यू झाल्याने आता दहा मांजरी आहेत. 

7/7

ऑफीसमध्येच राहतात

दहा मांजरींपैकी आठ मांजरी ऑफीसमध्येच राहतात. दोन मांजरी कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबत त्याच्या घरी राहतात. क्यूनोट सारख्या अजून काही कंपन्या जपानमध्ये आहेत.