सलमान खान आणि कतरिना कैफ जखमी? फोटो लीक होताच एकच खळबळ
सलमान-कतरिना यांची अवस्था अगदी वाईट झाली आहे.
मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' ची शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. दरम्यान, सेटवरून या दोन स्टार्सचे फोटो लीक झाले आहेत, जे व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सलमान-कतरिना यांची अवस्था अगदी वाईट झाली आहे.
'टायगर 3' च्या सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान जखमी दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर अनेक जखमा आहेत, सलमान खानच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. हे सगळे फोटो सेटवरील आहेत. त्यामुळे सीनसाठी कतरिना आणि सलमानने असा मेकओव्हर केल्याचं बोललं जात आहे.
हा फोटो 'टायगर 3' च्या सेटवरील आहे जिथे कतरिना आणि सलमान स्टंट करताना दिसले होते. या फोटोंमध्ये कतरिना कॉम्बॅट व्हेस्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे.
तर सलमान खान टी-शर्टसह ट्राउझरमध्ये दिसत आहे. या दोघांना पाहून या चित्रपटातही प्रेक्षकांना दमदार अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.