मुंबई  : सलमान खान 'बीईंग ह्युमन' या एनजीओच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया ते अगदी माफत दरात आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाते. 


सलमान खानचा नवा प्रोजेक्ट 


अभिनेता सलमान खान लवकरच 'LookGoodtoGood'या नव्या प्रोजेक्टला घेऊन येणार आहे. आज सलमान खानने त्याबाबत एक खास ट्विट केले आहे.


 



खरे हिरो येणार पुढे  


सलमान खान लवकराच समाजातील परोपकारी व्यक्तींची कहाणी समाजासमोर आणणार आहे. या प्रोजेक्टबद्दल लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल असे सलमान खानने ट्विटमध्ये लिहले आहे. 


सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट 


अभिनेता सलमान खान लवकरच 'रेस3', 'भारत' या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' या चित्रपटाचे काम सुरू आहे. 2014 साली आलेल्या 'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटावर 'भारत' हा चित्रपट आधारित आहे. 


'भारत' चित्रपटाचे शूटिंग पंजाब, दिल्ली, अबुधाबी आणि स्पेनमध्ये होण्याची शक्यता आहे. 2019 सालच्या ईदला हा चित्रपट रीलिज होणार आहे. सध्या सलमान 'रेस 3' चं शूटिंग करत आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल, साकिब सलीम, डेसी शाह झळकणार आहे.