मुंबई : कोरोना काळात मदतीची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सलमान खान स्वतः रस्त्यावर उतरून मदत करत आहे. कोरोनाच्या काळात मुंबई पोलीस भर उन्हात रस्त्यावर उभं राहून काम करत आहेत. तर आपले फ्रंटलाईन वर्कर दिवस-रात्र काम करत आहेत. (Salman Khan Being Human foundation steps up to feed front line workers in Mumbai during COVID-19)  या सगळ्यांसाठी सलमान खान जेवणाचं अभियान राबवत आहे. यामध्ये सलमान खानचे फूड ट्रक जेवणं घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात राज्याला मदत करणाऱ्या सगळ्यांनाच सलमान मोफत जेवण देत आहेत. यामुळे सलमान खानची खूप चर्चा देखील झाली आहे. मुंबईत कोरोनाने गेल्यावर्षी शिरकाव केला तेव्हापासून सलमान खानचं हे अभिया सुरू आहे. 



सलमान खानचे 'Being Hungry' नावाचे फूड ट्रक रस्त्यावर उतरले आहे. यांच्यामाध्यमातून हजारो लोकांना जेवण देत आहे. या ट्रकमधून फक्त कोरोना वॉरिअर्सच नाही तर गरीब आणि गरजू लोकांना देखील अन्न दिलं जातं. 


लॉकडाऊनमध्ये मार्केट बंद सलमान खानच्या या अभियानात युवा सेनेचा नेता राहुल कनाल देखील सहभागी आहे. एका मुलाखतीत राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईत काम करत आहे. पोलीस अधिकारी, बीएमसी वर्कर आणि हेल्थ वर्कर यांच्याबाबत चिंता व्यक्त केली. लॉकडाऊनच्या परिस्थितीत मार्केट बंद आहे. अशावेळी गरजूंना अन्न कसं मिळेल? या प्रश्नांवर सलमान खानने उत्तर दिलं आहे.


मुंबईत लोकांना ग्रोसरी शॉपमध्ये 4 तास लांब रांग लावावी लागत आहे. राहुल कनाल म्हणाले की,'या फूड ट्रकमध्ये कोरोना वॉरिअर्स आणि इतर गरजू लोकांना मदत केली जात आहे. Being Hungry हा फूड ट्रक मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहे. याच्या माध्यमातून फूड किट, चहा, बिस्किट, मिनिरल वॉटर, नाष्टा यासारखे पदार्थ दिले जातात.'