COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बिग बॉस प्रोमो व्हायरल झाला आहे, यूट्यूबवर भारतातून पाचव्या नंबरवर तो ट्रेन्ड करतोय. यात सलमान खानने बिगबॉस सिझन ११ साठी बिग बॉस पाहण्याचं आवाहन केलं आहे. 


बिगबॉस या कार्यक्रमातील अनेक घटना या वादात येतात. विशेष म्हणजे बिगबॉसवर अनेक प्रेक्षकांकडून टीका होत असली, तरी बिगबॉसला चांगली प्रेक्षक संख्या मिळते. 


मात्र सलमान खानला प्रोमोमध्ये घेण्याचं आणखी एक कारण असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे, कारण बिगबॉसला प्रतिसाद मिळत असला, तरी ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे, तेवढा मिळताना दिसत नाही.