मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खानला साप चावल्याची बातमी येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. काल रात्री तो पनवेल येथील त्यांच्या फार्महाऊसवर असताना त्याला साप चावला. त्यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या सापाला आता पकडण्यात आला आहे. हा साप बिनविषारी असल्याचं ही समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानसोबत नक्की काय घडलं?


रात्री बाहेर असताना सलमान खान त्याच्या फार्म हाऊसवर असताना त्याला हा साप दिसला, सापाला बाहेर काढताना सलमान खानच्या हाताला त्याने दोन -तीन ठिकाणी दंश केला. साप चावल्यानंतर सलमान खानवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला कामोठे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.   



सलमानवर उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले ?


कामोठे मधील डॉक्टरांच्या टीमने सलमान खानवर उपचार करून त्याला अंडर ऑब्झरव्हेशन ठेवले होते. डॉक्टरांकडून माहिती मिळत आहे की, सहा तास रुग्णालयात राहिल्या नंतर सलमान खानच्या विनंती नुसार त्याला डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर दुपारी पुन्हा एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरच्या टीमने पुन्हा फार्म हाऊसवर जाऊन सलमानची तपासणी केली. यात सलमान खानची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.



सलमानला चावणारा साप सापडला


बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला चावलेला साप (Snake) अखेर सापडलाय. सलमानला पनवेलच्या (Panvel) फार्महाऊसमध्ये या सापाने दंश केला होता. दरम्यान आता सलमानला ज्या ठिकाणी साप चावला त्या परिसरातून त्याला पकडण्यात आलं आहे. त्या सापाला पकडून बाटलीबंद केलं गेलं आहे.