मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्या क्षणापासून सलमान खानच्या नावाभोवती प्रसिद्धीचं वळण पाहायला मिळत आहे. चित्रपटांपासून ते अगदी रिअॅलिटी शोपर्यंत सर्वत्र सलमाननं रुपेरी पडदा गाजवला. या अभिनेत्यानं काही खास व्यक्तींशी तितकंच खास नातंही जपलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नातं असं आहे जे फक्त शब्दांमध्ये मांडणंही अशक्य आहे. कतरिना, लुलियापेक्षाही सलमानचा 'या' व्यक्तीवर जास्त विश्वास आहे. 


मागच्या 26 वर्षांपासून सलमानच्या सावलीप्रमाणे त्याच्यासोबत जवळपास सर्व ठिकाणी ये-जा करणारी ही व्यक्ती म्हणजे त्याचा सुरक्षारक्षक अर्थात त्याचा बॉडीगार्ड शेरा. 


गुरमीत सिंग जॉली असं त्याचं खरं नाव असलं, तरीही शेरा हीच त्याची ओळख सर्वांना ठाऊक आहे. 


शेराच्या सोशल मीडिया अकाऊंटवरव फेरफटका मारल्यास एक बाब अधिक प्रर्षानं जाणवते, ती म्हणजे सलमानप्रती असणारा त्याचा प्रामाणिकपणा. 


'मालिक', अशी हाक मारत शेरा जेव्हा सलमानचा उल्लेख करतो तेव्हा तेव्हा त्याच्या आवाजातून खरेपणा झळकत असतो. 


सलमाननंही त्याला आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीइतकंच महत्त्वं दिलं आहे. 



अतिशय महत्त्वाच्या अशा भक्कम पायावर सलमान आणि त्याच्या या विश्वासार्ह शेराचं नातं उभं आहे. पुढेही हे नातं असंच भक्कम असेल यात शंका नाही.