Salman Khan Buys New Bullet Proof SUV: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईत हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई गँगकडून त्यांच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली आणि त्यानंतर अभिनेता सलमान खान याच्यावर या टोळीची असणारी वक्रदृष्टी चर्चेचा विषय ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिष्णोई गँगकडून सलमानच्या नावेही धमकीवजा मेसेज आल्यामुळं पोलिसांपासून त्याची खासगी संरक्षण यंत्रणाही सतर्क झाली असल्याचं यानंतर पाहायला मिळालं. या सर्व घडामोडींमध्ये आता सलमाननं म्हणजे स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली आणि चाहत्यांची नजरही त्याच्या या निर्णयावर रोखली. 


सलमानचा हा निर्णय म्हणजे, बुलेटप्रूफ कार खरेदी करण्याचा. सूत्रांच्या माहितीनुसार भाईजाननं एक बुलेटप्रूफ कार खरेदी केली असून, दुबईहून ही कार आणण्यात आली आहे. या कारमध्ये असणारे खास फिचर पाहता त्यामुळंच तिची किंमतही तितकीच तगडी आहे हे नाकारता येत नाही. 


काय आहेत या नव्याकोऱ्या कारची वैशिष्ट्य? 


सलमाननं निसानची पेट्रोल स्पोर्ट एसयुव्ही खरेदी केली असून, ही एक बुलेटप्रूफ कार आहे. यामध्ये वॉर्निंग अलर्ट, जवळून किंवा दुरून होणाऱ्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठीची संरक्षक काच, प्रवाशांची ओळख गुलदस्त्यात ठेवणारे टिंटेड विंडो कव्हर असे फिचर आहेत. या कारची किंमत 2 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. 


हेसुद्धा वाचा : Google Map मुळं बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये दिसला रहस्यमयी दरवाजा; Viral Photo मुळं वाढला गुंता 


भारतात उपलब्ध नसल्यामुळं सलमाननं ही कार दुबईहून आयात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही त्याच्याकडील दुसरी बुलेटप्रूफ कार ठरत आहे. यापूर्वी त्यानं टोयोटाची बुलेटप्रूफ लँड क्रूजर LC200 खरेदी केली होती. या दोन्ही कारव्यतिरिक्त बी टाऊनच्या या अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी ए8 एल (13 कोटी रुपये), बीएमडब्ल्यू एक्स6 (1.15 कोटी रुपये), टोयोटा लँड क्रूजर (1.94 कोटी रुपये), ऑडी आरएस7 (1.4 कोटी रुपये), रेंज रोवर (2.6 कोटी रुपये), ऑडी आर8 (2.31 कोटी रुपये) आणि लेक्सस एलएक्स470  (2.32 कोटी रुपये) या आलिशान कारही आहेत.