मुंबई : सलमान खान  (Salman Khan) हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. आजही त्याच्या चित्रपटांची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. लवकरच तो 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे. 1988 मध्ये त्यांनी 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अलीकडेच सलमान खान  (Salman Khan) ने काजोल (Kajol) सोबत कशी फसवणूक केली. याचा खुलासा खुद्द भाईजानने बिग बॉस 16  (Bigg Boss 16) च्या मंचावर केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचा पहिला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' मध्ये रेखा मुख्य भूमिकेत होत्या हे तुम्हाला माहिती आहेच. या चित्रपटातून सलमानला विशेष ओळख मिळवता आली नाही. 1989 मध्ये आलेला मैंने प्यार किया हा सलमान खानचा पहिला यशस्वी चित्रपट होता. त्यानंतरच सलमान खानला भरपूर यश मिळालं.


 खरं तर बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) तिच्या 'सलाम वेंकी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या स्टेजवर गेस्ट म्हणून पोहोचली होती. दरम्यान, काजोलने (Kajol New Movie )24 वर्षांपूर्वी आपल्यासोबत झालेल्या विश्वासघाताबद्दल सांगितलं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमान म्हणाला- 'एक चित्रपट होता ज्यामध्ये एक सीन होता ज्यात एकमेकांसबत नजर मिळवायची होती...' सलमान खान आपलं बोलणं पूर्ण करताच काजोल म्हणाली, 'मला असं म्हणायचं आहे की, मला 24 वर्षे झाली पण मला अजूनही आठवतं की ती, चीटिंग-वीटिंग नव्हती...म्हणजे ईथ काहीतरी गडबड केली होती.' यावर सलमान त्याच्या स्पष्टीकरणात म्हणतो, 'नाही... नाही, माझ्या डोळ्यात काहीतरी चूकन गेलं होतं.' हा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.