मुंबई : अभिनेत्री ईशा तलवार लवकरच पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत रानम या मल्याळम सिनेमात झळकेल. यावर ईशा म्हणते की, गेल्या सहा वर्षांपासून पृथ्वीराजसोबत काम करण्यासाठी ती वाट पाहत आहे.


ईशा म्हणते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबद्दल ईशाने सांगितले की, मला पहिल्यांदा जेव्हा रानम सिनेमासाठी फोन आला तेव्हा मला कोणीतरी माझ्यासोबत मस्करी करत आहे, असे वाटले. मात्र हा फोन अमेरिकेहून आला होता. त्यानंतर पृथ्वीराज यांनी मला मेसेज पाठवून सिनेमासाठी विचारले. सलमान सोबत ट्युबलाईट सिनेमात झळलेली ईशाला पृथ्वीराजसोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी आहे. रानम सिनेमा 13 एप्रिलला प्रदर्शित होईल. याचे दिग्दर्शन निर्मल सहदेव यांनी केले आहे.


ऐश्वर्यासोबत या सिनेमात केले होते काम


टयुबलाईटमध्ये मायाच्या भूमिकेतील ईशा तलवार प्रेक्षकांना भावली. सिनेमात अगदी साधी दिसलेल्या ईशाचा मॉडर्न अवतार. ईशा तलवार सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. वेळोवेळी ती आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. कदाचित हे तुम्हाला माहित नसेल की, ईशाने ऐश्वर्यासोबत हमारा दिल आपके पास है या सिनेमात काम केले होते. त्यात तिने ऐश्वर्याच्या लहान बहिणीची भूमिका निभावली होती.