सलमान खान शब्दाचा पक्का! 9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची भाईजाननं घेतली भेट
Salman Khan Fan meet : अखेर सलमाननं दिलेला शब्द केला पूर्ण! सलमाननं केलेल्याा त्या कृत्याचं सगळीकडे कौतुक
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे लाखो चाहते आहेत. तो अनेकदा त्यांच्या चाहत्यांच्या मदतीला धावून येतो. सलमाननं आजवर त्याच्या अनेक चाहत्यांना मदत केली आहे. त्यातील काहीच लोक समोर येऊन सांगतात. त्यातील आता एका व्यक्तीनं समोरून सलमानच्या मदतीविषयी सांगितलं आहे. सलमाननं नुकतीच त्याच्या 9 वर्षांच्या चाहत्याची भेट घेतली. त्याच्या या चाहत्याचं नाव जगनबीर आहे. 9 कीमोथेरेपी केल्यानंतर त्यानं कॅन्सवर मात केली आहे. 2018 मध्ये सलमान खान पहिल्यांदा जगनबीरला मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भेटला होता. जिथे चार वर्षांच्या मुलाची ट्यूमरसाठी कीमोथेरेपी सुरु होती.
जगबीरला सलमाननं वचन दिले होते की कॅन्सरवर विजय मिळवल्यानंतर तो त्याला भेटायला येईल. सलमाननं त्याला असं वचन देण्याचं कारण एकच होतं की त्या आशेनं तो कॅन्सरशी अधिक ताकदीनं लढा देईल. सलमाननं डिसेंबर 2023 मध्ये वांद्रेत असलेल्या त्याच्या घरी जगनबीरची भेट घेत त्याचा कॅन्सरचा लढा सुरु होतो त्यावेळी केलेलं वचन पूर्ण केलं आहे.
'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत जनगबीरची आई सुखबीर कौरनं खुलासा केला की जगनबीर 3 वर्षांचा असताना त्याच्या मेंदुत नाण्याच्या आकाराचा ट्यूमर असल्याचं कळलं. त्यानंतर त्याला दिसणं बंद झालं होतं. या कठिण परिस्थितीचासामना करत असताना, डॉक्टरांनी दिल्ली किंवा मुंबईत उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. जगनबीरची अवस्था पाहता त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. तर जगनला या गोष्टीवर विश्वास होता की सलमान खानला नक्कीच भेटेल.
हेही वाचा : पैशांची चणचण असतानाही बिग बिंनी नव्हती घेतली धीरूभाईंची मदत; सगळ्यांसमक्ष अंबानीं म्हणाले, 'हा पडला...'
जनगबीरच्या आईनं खुलासा केला की 'जगनला असं पाहून, त्याला सत्य काय आहे हे न सांगण्याचा निर्णय घेतला. जगनबीरला रुग्णालयात जेव्हा दाखल करण्यात आले होते, तेव्हा एकदा त्यानं सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडीओ सलमान खानपर्यंत पोहोचला होता, त्यानं तेव्हा जगनबीरला भेटण्याचे वचन दिले. जेव्हा सलमान भेटला तेव्हा त्यानं सलमानचा चेहरा आणि त्याच्या ब्रेसलेटला हात लावला. सुखबीरनं आनंदानं सांगितलं की त्याचा मुलगा आता ठीक आहे. तो आता पूर्णपणे ठीक आहे. त्याशिवाय तो रोज शाळेत देखील जातो.'